BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२२ फेब्रु, २०२२

असा असणार यंदाचा पावसाळा .... शेतकरी बांधवासाठी महत्वाची बातमी !



नवी दिल्ली : उन्हाळ्याचे दिवस सुरु झाले असले तरी पावसाळ्याबाबत दिलासादायक बातमी असून यंदा समाधानकारक पाऊस होणार असल्याची वर्दी स्कायमेटने दिली आहे. 


उन्हाळ्याची चाहूल लागली की आगामी पावसाळा कसा असेल याची उत्सुकता शेतकरी बांधवाला असते. मागील वर्षी सगळीकडेच चांगला पावसाळा गेला त्यामुळे पाणीटंचाईची कठीण परिस्थिती यंदा निर्माण झाली नाही. जमिनीतील पाणी पातळी देखील व्यवस्थित असल्याने विहिरींना पुरेसे पाणी आहे शिवाय उजनी धरणात यंदा मुबलक पाणी साठा आहे त्यामुळे शेतकऱ्यांना यावर्षी पाण्याची अडचण भासताना दिसत नाही.  फेब्रुवारी महिना संपत आला असून उन्हाळ्यात देखील पाण्याची समस्या निर्माण होणार नाही हे स्पष्ट आहे. त्यातच आगामी पावसाळा समाधानकारक असल्याची दिलासादायक बातमी स्कायमेट ने दिली आहे. 


यावर्षी देशात मान्सून सामान्य राहील असा अंदाज स्कायमेटने व्यक्त केला आहे. स्कायमेटने २०२२ साठी मान्सूनचा प्राथमिक अंदाज जारी केला असून त्यानुसार यंदा मान्सून सामान्य राहणार आहे. सरासरीच्या ९७ ते १०४ टक्के पाउस होण्याचा हा अंदाज नक्कीच दिलासादायक आहे.  पावसाळ्याच्या सुरुवातीच्या काळात मान्सून चांगला असेल आणि या काळात भरपूर पाउस होईल. हा हंगामी काळ शेतकऱ्यासाठी अनुकूल राहील. ऑगष्ट आणि सप्टेंबरच्या मध्यात मात्र कमी पाऊस होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. यावर्षीचा मान्सून मात्र सामान्य राहणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. स्कायमेटकडून एप्रिल महिन्यात पावसाबाबत सविस्तर अंदाज व्यक्त करण्यात येणार आहे.   


एकूण सद्याच्या अंदाजानुसार सलग चौथ्या वर्षी देशात चांगला पाऊस राहणार असल्याचे दिसत आहे. तथापि पूर्ण पावसाबद्धल बोलायचे झाल्यास थोडे थांबावे लागेल असे देखील हवामान अभ्यासकांनी सांगितले आहे.. एप्रिलमध्ये येणार अंदाज अधिक महत्वाचा ठरणार आहे परंतु यावर्षी पावसाची चांगली सुरुवात होऊ शकते आणि सुरुवातीच्या काळात पाऊस समाधानकारक होऊ शकतो असे मात्र स्पष्ट करण्यात आले आहे.  पहिल्या दोन महिन्यातच जमिनीतील पाणी पातळी चांगली वाढेल असे देखील हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे उन्हाळ्याचे चटके बसण्याआधीच हवामान विभागाने दिलासादायक बातमी दिली आहे.   


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !