BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२१ फेब्रु, २०२२

पतीची आत्महत्या, पत्नीसह सासू सासऱ्याला सक्तमजुरीची शिक्षा !

 



पंढरपूर : पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीने केलेल्या आत्महत्येप्रकरणी पत्नी आणि सासू सासरे यांना एक वर्षाची सक्तमजुरी आणि दंड अशी शिक्षा पंढरपूर जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी सुनावली आहे. 


सांगोला तालुक्यातील हातीद येथील विनोद नामदेव गेजगे यांनी आत्महत्या केली होती. या आत्महत्येस जबाबदार धरून न्यायालयाने विनोद गेजगे यांची पत्नी पूजा गेजगे, सासरे लक्ष्मण बडंगे आणि सासू भाग्यश्री बडंगे याना करावासासह द्रव्यदंडाची शिक्षा सुनावली आहे.  मयत विनोद गेजगे आणि पूजा ३१ डिसेंबर २०१५ रोजी झाला होता. विवाहानंतर काही दिवस व्यवस्थित गेले पण नंतर विनोद आणि पूजा यांच्यात वाद होऊ लागले आणि पूजा ही या वादातून सतत माहेरी जाऊ लागली. मध्यस्थानी मध्यस्थी करून वाद मिटवल्यावर ती पुन्हा सासरी येत होती. पत्नी पूजा ही सतत पती विनोद यांच्याशी  भांडण करीत होती शिवाय त्यांच्याशी ती व्यवस्थित बोलत देखील नव्हती. या सर्व प्रकारास तिचे आई वडील यांची फूस असायची. 


१२ फेब्रुवारी २०१८ रोजी बँकेत खाते काढण्याच्या विषयावरून कागदपत्रे देण्याच्या कारणावरून पुन्हा वाद झाला आणि आरोपींची मयत विनोद यास मारहाण केली. या मारहाणीमुळे निराश झालेल्या आणि वैफल्यग्रस्त झालेल्या विनोद गेजगे यांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. विनोद यांनी केलेल्या आत्महत्येस त्याची पत्नी पूजा तसेच त्याचे सासू सासरे हेच जबाबदार असल्याची फिर्याद विनोद याचा भाऊ  दिनेश नामदेव गेजगे यांनी  पोलीस ठाण्यात दिली होती.  सांगोला पोलीस ठाण्यात ही तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तिन्ही आरोपी यांच्याविरोधात दोषारोपपत्र दाखल केले होते. 


सदर खटल्याची सुनावणी पंढरपूर जिल्हा व सत्र न्यायालयात झाली आणि न्यायालयाने विनोद गेजगे यांच्या आत्महत्येप्रकरणी पत्नी पूजा गेजगे तसेच सासरे लक्ष्मण बडंगे आणि सासू भाग्यश्री बडंगे याना जबाबदार धरले. या खटल्यात एकूण ९ साक्षीदारांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या परंतु त्यातील ५ साक्षीदार हे फितूर झाले. महत्वाच्या साक्षी, कागदपत्रे याचे अवलोकन करून न्यायालयाने तिघांनाही दोषी धरले आणि तीनही आरोपीना एक वर्षे सक्तमजुरी आणि पाचशे रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. या खटल्यात सरकार पक्षातर्फ ऍड. सारंग वांगीकर, ऍड. आनंद कुर्डुकर  यांनी काम पाहिले.         

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !