BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

४ फेब्रु, २०२२

वारकऱ्यांनी बंडातात्यांच्या प्रतिमेला चपला मारल्या !

 



कराड : जेष्ठ कीर्तनकार म्हणून प्रसिद्ध असलेल्या बंडातात्या कराडकर आपल्या वादग्रस्त विधानामुळे भलतेच अडचणीत आले असून आता वारकऱ्यांनीच  बंडातात्यांच्या प्रतिमेला चपला मारून निषेध व्यक्त केला आई त्यांना कराड शहरात प्रवेश करू न देण्याचा इशारा दिला. 


हरिभक्त परायण बंडातात्या कराडकर हे वारकरी संप्रदायातील सर्वपरिचित जेष्ठ कीर्तनकार आहेत, संप्रदायात त्यांचा मान आहेच पण राजकीय क्षेत्रातही त्यांचा दबदबा टिकून होता. खासदार सुप्रिया सुळे आणि पंकजा मुंडे यांच्याबाबत अकारण वक्तव्य करून त्यांनी मोठा वाद ओढवून घेतला आणि आपली इभ्रत डावावर लावली. सुप्रिया सुळे आणि पंकजा मुंडे या दारू पिऊन नाचतात, ढीगभर पुरावे आहेत अशा प्रकारची धक्कादायक आणि जेष्ठ कीर्तनकाराच्या तोंडी न शोभणारी विधाने त्यांनी अकारण केली आणि आपले स्थान त्यांनी अस्थिर केले. राजकीय वर्तुळात अपेक्षेप्रमाणे या विधानांचे पडसाद उमटत आहेतच पण वारकरी संप्रदायातील मंडळींनी देखील बंडातात्या यांचा निषेध करून त्यांच्या फोटोला चपला मारल्या आहेत. 


कराड येथीलच मारुतीबुवा मठात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसह वारकरी संप्रदायातील लोकांनी बंडातात्या कराडकर यांचा संतप्त निषेध व्यक्त केला. त्यांच्या फोटोला चप्पलने मारत हा निषेध व्यक्त करण्यात आला. शिवाय कराड शहरात बंडातात्यांना प्रवेश करू देणार नाही असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे. वारकरी सांप्रदायात बंडातात्या याना मानाचे स्थान होते त्याच ठिकाणी अशा प्रकारे निषेध व्यक्त करण्यात आला आहे. ज्या मठात बंडातात्या लहानाचे मोठे झाले त्याच मठात आज त्यांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले, त्यांच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या.  राज्यातील वातावरण तर बंडातात्या यांच्या निषेधानेच भरून गेले आहे. 'आपली चूक झाली आहे, माफी मागतो, आता हा विषय वाढवू नका' असे वक्तव्य करून बंडातात्या यांनी आपले वक्तव्य मागे घेतले असले तरी राष्ट्रवादी बंडातात्याला क्षमा करायला तयार नाही. अत्यंत पातळी सोडून निषेध नोंदवला जात आहे आणि बंडातात्यांचा एकेरी उल्लेख केला जात आहे. 


राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांनी तर बंडातात्या वारकरी असण्यावर शंका घेत त्यांचे मूळ कुठे आहे याकडे लक्ष वेधले तर काँग्रेस पक्षाचे सचिन सावंत यांनी त्यांचे नाव न घेता 'संघ भक्त' असल्याचा शिक्का मारला आहे. शिवाय वारकरी संप्रदायात काही संघ भक्त पारायण घुसले आहेत, जे ह.भ.प. म्हणवून घेतात. कितीही दडवली तरी बोलण्यातून चड्डी दिसतेच. समाजात विष पसरविण्याचा यांचा डाव आहे. तुकाराम महाराज यांनीच याबाबत सावध केले आहे असे म्हणत संत तुकाराम महाराज यांच्या काही ओळींचा दाखला त्यांनी दिला आहे. l टिळा टोपी घालुनी माळा l म्हणती आम्ही साधू ll दयाधर्म चित्ती नाही l ते जाणावे भोंदू ll असे ट्विट सचिन सावंत यांनी केले आहे.     

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !