नागपूर : गेल्या सात वर्षापासून एका महिलेच्या फुफ्फुसात असलेली लवंग डॉक्टरांनी मोठ्या कौशल्याने बाहेर काढली असून आधी कॅन्सर असल्याचे निदान करण्यात आले होते.
सत्तावीस वर्षे वय असलेल्या एका महिलेला सतत खोकल्याचा त्रास होत होता. गेली दोन वर्षांपासून हा खोकला अधिकच वाढत गेला. डॉक्टरांची मदत घेतल्यानंतर डॉक्टरांनी छातीचा कॅन्सर असण्याची शक्यता वर्तवली. कॅन्सर म्हटलं की कुणाच्याही छातीची धडकी भरते. या महिलेच्या बाबतीत देखील तसेच घडले. कॅन्सर असणार म्हटल्यावर तिच्या कुटुंबाची अवस्था देखील अत्यंत वाईट झाली होती. अवघे कुटुंब एका वेगळ्याच तणावात आले होते. सदर महिला आणि तिचे कुटुंब कॅन्सरची भीती घेवूनच रोज जगत होते. अखेर या महिलेने सेकंद ओपिनियन म्हणून आणखी एका डॉक्टरांना दाखविण्याचा निर्णय घेतला. श्वसनतज्ञ डॉ. अशोक अरबट यांच्याकडे ही महिला गेली आणि डॉक्टरांनी तपासणी केली तेंव्हा वेगळेच आणि धक्कादायक समोर आले.
महिलेच्या छातीत कॅन्सर नव्हे तर लवंग अडकली असल्याचे निदान या डॉक्टरांनी केले. महिलेच्या डाव्या फुफ्फुसाच्या खालच्या भागात ही लवंग अडकली असल्याचे डॉक्टर अरबट यांना जाणवले. लवंग असल्याचे समोर आले नसते तर सदर महिलेच्या फुफ्फुसाचा अर्धा भाग कापून काढावा लागला असता पण लवंग अडकली असल्याचे दिसल्याने हा प्रसंग टळला. डॉक्टरांनी सात वर्षापूर्वी फुफ्फुसात अडकलेली लवंग शस्त्रक्रिया करून बाहेर काढली आणि रुग्ण महिलेस आराम मिळाला. महिला वेळेत आल्यामुळे हे शक्य झाले असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
सतत खोकला येत असल्याने आणि काही केल्या हा त्रास थांबत नसल्याने प्रारंभी डॉक्टरांनी कॅन्सर असल्याचे सांगितले होते त्यामुळे या महिलेसह तिचे कुटुंब अत्यंत तणावात आले होते. सात वर्षे तणावात जगल्यानंतर आपल्याला कॅन्सर नसल्याची माहिती तिला मिळाली. डॉक्टरांनी सात वर्षे फुफ्फुसात दडून बसलेली छोटीशी लवंग बाहेर काढली आणि महिलेला आराम देखील मिळाला. दुसऱ्या डॉक्टरांचे मत घेण्याची कल्पना त्यांच्या मनात आली आणि महिलेची कायमची सुटका झाली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !