मुंबई : राष्ट्रवादी कॉन्ग्रेस पक्षाचे प्रमुख आणि देशाचे नेते शरद पवार यांना कोरोनाची बाधा झाली असून त्यांनी स्वत:च याबाबतची माहिती दिली आहे.
शरद पवार यांनी आपल्या ट्विटरवरून याबाबत माहिती दिली असून ही बातमी समजताच राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्त्यांना धक्का बसला आहे. शरद पवार यांनी कोरोनाच्या कालावधीत नियमांचे पालन करीत घरात थांबणे पसंत केले होते. कोरोनाची दुसरी लाट ओसरू लागल्यानंतर जेंव्हा निर्बंध हटविण्यात आले होते त्यानंतर त्यांनी पुन्हा राज्यात आणि राजकारणात सक्रिय शहाभाग घेतला अहंता आणि अनेक भागात दौरे देखील केलेले होते. कोरोनाच्या दोन लाटा आल्या, विशेषतः दुसरी लाट प्रचंड तीव्र होती परंतु सुदैवाने कोरोना त्यांच्यापर्यंत पोहोचू शकला नव्हता. तिसऱ्या लाटेत मात्र त्यांना कोरोनाची बाधा झाली आहे.
शरद पवार यांचे वय ८० वर्षाच्या पुढे असले तरी ते तरुणाला लाजवेल असे काम आजही करतात परंतु त्यांना कोरोनाची बाधा झाल्याने त्यांच्यावर प्रेम करणारे सगळेच व्यथित झाले आहेत. त्यांच्या प्रकृतीची चिंता सगळ्यांनाच लागली आहे. अनेक मोठे आजार त्यांनी हिमतीने परतवून लावले आहेत तरीही त्यांचे वय पाहता कार्यकर्ते चिंतेत आहेत. स्वत: शरद पवार यांनीच काळजीचे कारण नसल्याचे सांगितले आहे तरी त्यांच्यावर प्रेम करणारा मोठा वर्ग आहे आणि सगळ्याच पक्षातील लोक त्यांच्यावर प्रेम करतात. त्यामुळे त्यांना लवकर आराम वाटावा म्हणून सगळ्याच पक्षातील लोकांनी प्रार्थना केली आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक नेत्यांना कोरोनाची बाधा झाली होती, तिसऱ्या लाटेतही अनेक नेते कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. यावेळी ओमीक्रॉनची घुसखोरी झालेली असून नियम आणि निर्बंध कडक केलेले आहेत. शरद पवार याना कोरोनाची लागण झाल्याची माहिती त्यांनीच आपल्या ट्विटरवरून दिली असून संपर्कात आलेल्यानी तपासणी करून घ्यावी असे त्यांनी म्हटले आहे.
पवार यांचे ट्विट
" माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे, मात्र काळजी कारण्याचां कारण नाही. माझ्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी उपचार घेत आहे. पण गेल्या काही दिवसांपासून माझ्या संपर्कात आलेल्या लोकांनी स्वतःची टेस्ट करून घ्यावी आणि आपली काळजी घ्यावी " असे ट्विट शरद पवार यांनी केले आहे'

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !