मुंबई : आगामी पाच दिवसात राज्यात किमान तापमानात हळूहळू घट होण्याची शक्यता असून २५ आणि २६ जानेवारीस तुरळक ठिकाणी थंडीची लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
गेल्या काही दिवसात हवामान थंड असून राज्यातील अनेक भागात तापमानात मोठी घात झाल्याचे दिसत आहे. पुणे, मुंबई, नाशिक, औरंगाबाद अशा शहरात तर २५ अंश सेल्सियसच्या देखील खाली तापमान नोंदले गेले आहे. पाकिस्तान आणि गुजराथ येथून आलेल्या धुळीच्या वादळाचाही परिणाम काही ठिकाणी दुसून आला असून धुळीच्या वातावरणामुळे राज्यातील तापमानात मोठी घट झाली असल्याची माहिती हवामान अभ्यासकांनी दिली आहे. गेल्या २४ तासात पावसाचे वातावरण असून मुंबईतील तपमान घातले आहे. उत्तर कोकण भागात धुळीचे वारे वाहण्याची शक्यता असून सुमारे २० ते ३० किमी वेगाने हे वारे वाहू शकते असे भारतीय हवामान विभागाने सांगितले आहे.
काल मुंबईत गेल्या दहा वर्षासतील निचांकी तापमानाची नोंद झाली असून कुलाबा येथे २४ अंश तर सांताक्रूझ येथे २३.५ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे सरासरीने ही ६ ते ७ अंश सेल्सियसने घट आहे. गेल्या दहा वर्षातील हे सर्वात कमी कमाल तापमान आहे. मागील २४ तासापासून राज्यात पावसाचे वातावरण असून आज सकाळपासून मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात तसेच राज्याच्या काही भागात धुके पाहायला मिळाले तर दिवसभर ढगाळ हवामान असल्याने कमाल तापमानात घट झाली आहे. उद्याही राज्यात अनेक भागात धुक्याची परिस्थिती राहणार असून पिकांची काळजी घेण्यात यावी असे आवाहन देखील करण्यात आले आहे.
राज्यात गारठा वाढलेला असून गेल्या दहा वर्षातील सर्वात नीचांकी तपमान नोंदले गेले आहे, राज्यातील अनेक जिल्हात तपमानात मोठी घट झाली आहे.
वाढत्या थंडीचा आजारी आणि वयस्कर व्यक्तींना त्रास होत असून विविध समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामुळे जेष्ठ नागरिकांनी आरोग्याची काळजी घेण्याची गरज आहे. गेल्या काही दिवसापासून हवामानात बराचसा बदल झाला असून रुग्णालयात रुग्णांची वाढती गर्दी दिसत आहे. संभाव्य थंडीच्या लाटेचा विचार करून उपाययोजना करून आरोग्य सांभाळण्याची आवश्यकता आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !