BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१२ जाने, २०२२

धोक्याची घंटा ! कोरोना लस न घेतलेल्याना अधिक धोका!


मुंबई : कोरोना प्रतिबंधात्मक लस घेण्यात आजही उदासिनता दिसत असली तरी  ज्यांनी अद्याप लस घेतली नाही त्यांच्यासाठी धोक्याची घंटा वाजू लागली आहे.

शासन आणि प्रशासन वर्षभरापासून कोरोना प्रतिबंधक लस घेण्याचे आवाहन करीत आहे,जनजागरण करीत आहे पण काही लोक अजूनही लसीपासून दूरच आहेत. लस घेतलेल्यानाही कोरोनाची बाधा होण्याचे प्रमाण अधिक असल्याने गैरसमज वाढण्यास मदत होत आहे पण लस घेतल्यानंतर धोका कमी होतो हे लक्षात घेतले जात नाही. आता तिसऱ्या लाटेत ही बेफिकीरी मात्र धोक्याची घंटा ठरु लागली आहे. मुंबई महापालिकेने  दिलेल्या माहितीनुसार फेब्रुवारी २०२१ ते जानेवारी २०२२ च्या पहिल्या आठवड्यापर्यंत शहर व उपनगरात कोरोनामुळे झालेल्या मृत्यूपैकी ९४ टक्के मृत्यू  हे लस न घेतलेल्या व्यक्तींचे झाले आहेत. या व्यक्तींनी लसीचा एकही डोस घेतलेला नव्हता. केवळ सहा टक्के लोकांनी लस घेतली होती.


ओमीक्रॉनमुळे कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असली तरी रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण मात्र कमी आहे. लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या व्यक्तीना ओमीक्रॉनची लागण होण्याचा धोका तुलनेने कमीच आहे. लस घेतलेली व्यक्ती बाधित झाली तरी त्यांच्यात तीव्र लक्षणे जाणवत नाहीत असे आयुक्त चहल यांनी सांगितले. लसीचे महत्व वारंवार सांगूनही काही प्रमाणात नागरिकांच्या मनात भीती आहे. अशी माहिती आरोग्य विभागकडून देण्यात आली आहे. 


दरदिवशी हजारोंच्या संख्येने रुग्ण वाढत असताना लस घेण्यात निरुत्साह दाखवला जात आहे चिंता वाढविणारी बाब ठरली आहे. लस न घेतलेल्याना अधिक धोका असल्याचे दिसून आले आहे त्यामुळे ज्यानी लस घेतलेली नाही त्यांनी वेळेत आणि शक्य तितक्या लवकर लस घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे. 

  

.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !