BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२४ जाने, २०२४

न्यायालयात हजर व्हा ! मनोज जरांगे यांना हायकोर्टाची नोटीस !



शोध न्यूज : मराठ्याचे वादळ मुंबईत परवा धडकणार असतानाच, एक मोठी घटना घडली असून, जरांगे पाटील यांना न्यायालयात हजर राहण्यासाठी नोटीस बजावण्यात यावी असे निर्देश आज उच्च न्यायालयाने दिले आहेत, त्यामुळे या आंदोलनाचे पुढे काय होणार ? याची चिंता मराठा बांधवांना लागली आहे. 


मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील, अगणित मराठा बांधवांसह मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. परवा हे वादळ मुंबईत धडकत आहे. शासनाने मनोज जरांगे पाटील यांना आश्वासने देत फसवणूक केली त्यामुळे मराठ्यांचे हे वादळ मुंबईच्या दिशेने निघालेले असून, जरांगे यांना मुंबईत आंदोलन करता येवू नये यासाठी विविध आघाड्यावर प्रयत्न होत आहेत. याचाच एक भाग म्हणून या आधी न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली  होती आणि जरांगे यांना मुंबईत येण्यापासून रोखावे अशी मागणी करण्यात आली  होती परंतु न्यायालयाने तसे निर्देश दिले नव्हते. त्यानंतर पुन्हा कायम मराठा आरक्षणाच्या विरोधात असलेले वकील गुणरत्न सदावर्ते यांनी जरांगे यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आणि आज त्याची सुनावणी देखील घेण्यात आली. या सुनावणी नंतर न्यायालयाने हेमोठे आदेश दिले आहेत.  त्यामुळे या आंदोलनावर एक प्रश्नचिन्ह उभे राहू लागले आहे.


मनोज जरांगे हे आंदोलनासाठी मुंबईकडे येत आहेत, गाड्या, बैलगाड्या घेवून अनेक मराठे मुंबईकडे येत असून, या आंदोलनाने मुंबईतील कायदा सुव्यवस्था अडचणीत येवू शकते, म्हणून या मोर्चाला प्रतिबंध करण्यात यावा तसेच सरकारने त्यांचावर कडक कारवाई करावी अशी मागणी गुणरत्न सदावर्ते यांनी मुंबई उच्च नायालायाकडे याचिकेद्वारे केली आहे. शिवाय मनोज जरांगे पाटील यांच्यावर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी प्रमुख मागणी देखील त्यांनी केली आहे. आत्तापर्यंत तरी जरांगे यांच्या आंदोलनाला कुठलीही परवानगी दिली गेली नाही. परवानगी दिली तर आम्ही त्यालाही चॅलेंज करू पण परवानगीच देण्यात आलेली नाही.   मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर अंतरवली सराटीत लाठीचार्ज दरम्यान 29 पोलीस जखमी झाले होते.हे देखील न्यायालयासमोर मांडण्यात आले. या सुनावणीनंतर मात्र न्यायालयाने याची दखल घेत निर्देश दिले आहेत.


आंदोलनामुळे रस्ते ब्लॉक होणार नाहीत याबाबतची खबरदारी सरकारने घ्यावी तसेच वाहतूक व्यवस्था कोलमडणार नाही याबाबतही शासनाने जबाबदारी घ्यावी असे निर्देश देतानाच न्यायालयाने मनोज जरांगे पाटील यांना मुंबई उच्च न्यायालयासमोर हजर राहण्याबाबत नोटीस देण्यात यावी असे निर्देश दिले आहेत. मनोज जरांगे पाटील यांना नोटीस बाजावण्यात यावी, ही नोटीस आझाद मैदान पोलिसांनी द्यावी तसेच आझाद मैदानात पाच हजारांपेक्षा अधिक लोक येवू शकत नाहीत हे त्यांना कळवावे असे स्पष्ट आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. 


मुंबई उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत पंढरपूर तालुक्यातील तारापूर येथे झालेल्या एका घटनेचा देखील संदर्भ देण्यात आला आहे. तारापूर येथे माळी समाजाच्या एका तरुणाने मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केली होती. या प्रकरणावर अनेकांनी आपली  मते व्यक्त केली  आहेत. (High Court notice to Manoj Jarange)  शासनातील मंत्री छगन भुजबळ यांनी  तर अनेकदा जाहीर सभामधून याचा उल्लेख केलेला आहे आणि पोलिसांकडे बोट दाखवले आहे. ही आत्महत्या नसून खून असल्याचा देखील आरोप झालेला आहे. या घटनेचा उल्लेख सदावर्ते यांनी आज न्यायालयात केला. पंढरपूरमध्ये एका नॉन मराठा तरुणाची हत्या हा देखील हे आंदोलन मोठं करण्यासाठी केलेल्या कृत्याचा भाग आहे. हत्या करुन फाशी दाखवण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र अशी फाशी लागत नाही. असे सदावर्ते यांनी सांगून त्यांनी न्यायालयासमोर प्रात्यक्षिक देखील करून दाखवले.


मराठा वादळ परवा मुंबईत धडक मारत असताना मुंबई उच्च न्यायालयाने मनोज जरांगे पाटील यांना न्यायालयात हजर राहण्याबाबत नोटीस देण्याचे निर्देश दिले असल्यामुळे आता या आंदोलनाचे पुढे  काय होणार ? हा प्रश्न  आहे. २६ जानेवारी पासून जरांगे हे आझाद मैदान येथे उपोषणासाठी बसणार आहेत. त्याच्या ऐनवेळी न्यायालयाचे हे आदेश आल्याने आता, मनोज जरांगे पाटील काय भूमिका घेतात याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. आंदोलन दडपण्याचा सतत प्रयत्न होत असल्याचा आरोप देखील मराठा बांधव करू लागले आहेत. अर्थात याचा पुढील निवडणुकीत मोठा प्रभाव पाहायला मिळू शकतो असे वातावरण तयार होताना दिसत आहे.






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !