BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

११ नोव्हें, २०२३

बाप रे ! राष्ट्रवादीच्या जेष्ठ नेत्यांचे हृदय पडले बंद आणि ---




शोध न्यूज : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते आणि भाजपचे माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे हृदय काही काळासाठी बंद पडले आणि त्यानंतर डॉक्टरांनी युक्ती वापरून पुन्हा ते सुरु केल्याची घटना समोर आली आहे.


एकनाथ खडसे यांच्या छातीत दुखू लागले होते आणि त्यानंतर त्यांची हृदयाची समस्या समोर आली होती. त्यांना तातडीने मुंबईच्या रुग्णालयात दाखल करणे आवश्यक होते परंतु तातडीने मुंबईला जाण्याची व्यवस्था होत नव्हती. अशा परिस्थितीत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने त्यांच्यासाठी एअर अम्बुलंसची व्यवस्था केली त्यामुळे त्यांना तातडीने मुंबईला उपचारासाठी पोहोचता आले. आणि केवळ त्यामुळेच आपले परान वाचले असे एकनाथ खडसे यांनी सांगितले आहे. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मनोमन आभार मानले आहेत. परंतु या दरम्यान एक वेगळीच घटना घडल्याचे समोर आले आहे. स्वत: खडसे यांनीच याबाबत मुख्यमंत्री शिंदे यांना सांगितले आहे. 


खडसे यांना मुंबईच्या बॉम्बे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्यानंतर त्यांच्या विविध तपासण्या करण्यात आल्या.  हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या वाहिन्यात दोन ब्लोकेज असल्याचे तपासणीत आढळून आल्यानंतर त्यांच्यावर अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्याचे निश्चित करण्यात आले. या शस्त्रक्रियेवेळीच एकनाथ खडसे यांना, कार्डीक अरेस्ट आला होता. त्यामुळे त्यांचे हृदय बंद पडले. यावेळी परिस्थिती अत्यंत गंभीर बनली होती पण शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांनी लगेच शॉक ट्रीटमेंट दिली आणि खडसे यांचे बंद पडलेले हृदय पुन्हा सुरु केले. सुदैवाने हृदय पुन्हा सुरु झाले म्हणून एकनाथ खडसे यांचे प्राण वाचले आहेत. हा धक्कादायक प्रकार स्वत: एकनाथ खडसे यांनीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सांगितला आहे. 


रुग्णालयात प्रकृती बरी झाल्यावर खडसे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क साधला. यावेळी दोघांत भावनिक बोलणे झाले.  विमान वेळेवर मिळाले नसते तर आपले प्राण वाचू शकले नसते असे खडसे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सांगितले आहे. एकनाथ खडसे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना म्हणाले " माझी प्रकृती बिघडली होती पण मला एअर अ‍ॅम्ब्युलन्स मिळत नव्हती, नाशिक येथून मिळत असली तरी हवेत उडण्यासाठी परवानगी मिळत नव्हती परंतु तुम्ही सांगितल्यामुळे लगेच पुढची व्यवस्था झाली. दोन ब्लॉकेज असल्यामुळे डॉक्टरांनी अँजिओप्लास्टी करण्याचा निर्णय घेतला. एका स्ट्रेचरवरुन दुसऱ्या स्ट्रेचरवर ठेवल्यानंतर कार्डीक अरेस्ट आला. माझं हृदय 100 टक्के बंद पडले. त्यावेळी डॉक्टरांनी दोन मिनिटे शॉक ट्रिटमेंट दिली अन् नशिबाने हृदय पुन्हा सुरु झालं. तुमचं विमान वेळेवर आलं नसतं तर माझं विमान लॅंड झालं नसतं. मदत करणारा मोठा असतो." 


या घटनेबाबत माहिती मिळाल्यानंतर एकनाथ खडसे यांचे कार्यकर्ते, सहकारी, हितचिंतक यांना मोठा धक्का बसला आहे. (Eknath Khadse's heart stopped and --- ) हृदय पूर्ण बंद पडूनही डॉक्टरांच्या प्रयत्नाने आपला नेता वाचला त्यामुळे सगळे मनापासून देवाला आणि डॉक्टरांना धन्यवाद देत आहेत. या धक्कादायक घटनेची राज्यभर चर्चा सुरु असून खडसे यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी देवाला साकडे घातले जाऊ लागले आहे.

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !