BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

३१ जुलै, २०२३

समाजातील सैतानाने पुन्हा काढले डोके वर ! नेत्यांना धमक्या !



शोध न्यूज : स्वत:ला गुरुजी म्हणऊन घेणाऱ्या मनोहर भिडे याना अटक करण्याची मागणी वाढत असताना, भित्र्या गुंडाने आता पुन्हा कॉंग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांना 'कोथळा बाहेर काढू' अशी धमकी दिली आहे. काल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना अशीच धमकी देण्यात आली होती.


मनोहर भिडे उर्फ संभाजी भिडे या गुरुजीने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल गरळ ओकली होती त्यामुळे महाराष्ट्र खवळलेला असताना लगेच त्यानी महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबाबत अत्यंत अवमानास्पद वक्तव्य केले आहे. वादग्रस्त वक्तव्यासाठी कुप्रसिद्ध असलेल्या भिडे यांनी अशा संतापजनक वक्तव्याचा सपाटाच लावला आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी त्याच्या अटकेची मागणी केली आणि त्यांना धमकी दिली गेली. त्यानंतर कॉंग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी एक ट्वीट केले होते. त्यानंतर त्यांनाही ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे.


कैलास सूर्यवंशी नावाने असलेल्या ट्विटर हँडल वरून जीवे मारण्याच्या धमकीचे ट्विट करण्यात आले आहे. या प्रकारानंतर यशोमती ठाकूर यांनी अमरावती पोलिस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली असल्याची माहिती समोर आली आहे. आपल्या तत्वांशी, विचारांशी तडजोड करू नका. लक्षात ठेवा इतिहास गद्दारांचा नाही तर लढणा-यांचा लिहिला जातो. आज इतिहासाने आपल्यावर एक जबाबदारी सोपवलीय. आज जर आपण चुकलो तर हा देश आपल्याला माफ करणार नाही. देशाची लोकशाही टिकवायची असेल तर द्वेष पेरणा-यांना थारा देऊ नका. जय हिंद! असे ट्वीट यशोमती ठाकूर यांनी केले होते. याला उत्तर म्हणून ही धमकी दिली गेली आहे.


दाभोलकर असाच ओरडत होता.. टरटरा फाडून टाकला आणि जन्नत मध्ये पाठवला.. तुमचीही हीच परिस्थिती होईल.. धारकरी कोथळा बाहेर काढतील असा आशय असलेले ट्वीट करून धमकी देण्यात आली आहे.


वारंवार बरळत सुटलेल्या मनोहर तथा संभाजी भिडे याच्या पुतळ्याला उलटा लटकावत लाथा घालण्याचे काम सोलापूर जिल्ह्यात करण्यात आले आहे. (Manohar Bhide threats to Congress leaders)  देशात प्रत्येकालाच कायदा आहे पण या भिडेसाठी कसलाच कायदा नाही असे चित्र एकूण वर्तनावरून दिसत आहे. 


मनोहर भिडे  उर्फ संभाजी भिडे यानी गेल्या काही वर्षापासून राज्यात अनेक वाद निर्माण केले आहेत, राष्ट्रपुरुषाबद्धल कुणी अनुद्गार काढले तर त्याच्यावर लगेच कारवाई होते, झालीही पाहिजे, या भिडेसाठी मात्र सगळे स्वातंत्र्य आहे काय ? असा सवाल मात्र उपस्थित होत आहे. गेल्या काही वर्षात भिडे याने अनेक वादग्रस्त विधाने केली आहेत, समाजात त्याचे पडसाद देखील उमटले आहेत पण भिडे मात्र कायद्यापासून दूर आहे. त्याना कुणाचा आशीर्वाद आहे हे तमाम जनतेला माहित आहेच पण, अशा आशीर्वादावर काहीही करता येते याचे चित्र आता अधिक गडद झाले आहे. आता तर या भिडेने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याच विरोधात गरळ ओकली आहे.  


राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याविरोधात वादग्रस्त विधान केल्यानंतर संभाजी भिडे यांच्या विरोधात विरोधी पक्ष चांगलेच आक्रमक झाले आहेत. विरोधी पक्षांच्या वतीने राज्यभरात भिडे यांचा निषेध केला जात आहे.यातच आज सोलापूर येथील मोहोळ राष्ट्रवादीकडून भिडे  प्रतिकात्मक पुतळ्याला उलट टांगून निषेधार्थ फाशी देण्यात आली. तसेच राष्ट्रवादीच्या आक्रमक कार्यकर्त्यांनी भिडे च्या प्रतिकात्मक पुतळ्याला लाथा घातल्या. यासोबतच भिडे च्या उलट्या लटकावलेल्या प्रतिकात्मक पुतळ्याची शहरभर वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली. यानंतर मोहोळ पोलीस ठाण्यात भिडेवर  गुन्हा दाखल करण्यासाठी राष्ट्रवादीच्या वतीने निवेदन देण्यात आले.  राज्यात विविध ठिकाणी भिडेच्या विरोधात आक्रोश होऊ लागला आहे पण, सामन्य मानासानासाठी असलेला कायदा त्याच्यासाठी  कधी लागू होईल याचीच प्रतीक्षा लागून राहिली आहे.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !