BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२८ मे, २०२३

शिंदे गटातील आमदार पती पत्नी अपघात जखमी !


 

शोध न्यूज : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या दोन आमदारांच्या गाडीला मोठा अपघात झाला असून सुदैवाने हे दोघेही बचावले आहेत. चोपडा - जळगाव रस्त्यावरील करंज गावाजवळ रात्री हा अपघात झाला आहे.


मागील काही काळापासून लोकप्रतिनिधींच्या गाड्यांच्या अपघाताचे सत्रच सुरु झाले असून अजूनही ते थांबत नाही. शिवसेना शिंदे गटाच्या आमदार लता सोनवणे आणि त्यांचे पती माजी आमदार चंद्रकांत सोनवणे हे आपल्या गाडीतून चोपडा कडून जळगाव कडे येत होत्या. चोपड्या हून जळगाव कडे येत होते. दरम्यान  जळगाव कडून चोपडा कडे निघालेल्या एका डंपरने आमदार लता सोनवणे यांच्या इनोव्हा गाडीला जोराची धडक दिली. या घटनेत आमदार लता सोनवणे आणि त्यांचे माजी आमदार पती प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे हे दोघेही जखमी झाले. (Shinde group MLA husband wife injured in accident)  त्यांना मुका मार लागला असून या दोघानाही रुग्णालयात दाखल करण्यात आले. सदर अपघाताची माहिती माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांनीच दिली आहे शिवाय अपघातात लागलेल्या माराची माहिती देखील त्यांनीच सांगितली. मुका मार लागला असला तरी केवळ नशिबानेच आम्ही दोघेही वाचलो आहोत अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.


सदर पती पत्नीसह त्यांचे चालक आणि अंगरक्षक देखील जखमी झाले आहेत परंतु त्याचीही तिव्रता मोठी नाही. अपघातानंतर सोबत असलेल्या पोलीस स्कॉड वाहनातूनच जखमींना जळगावला हलविण्यात आले. हा अपघात करंज व धानोराच्या दरम्यान शनिवारी रात्री पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास झाला.  एका कार्यक्रमासाठी आमदार गेले होते आणि तेथून ते परत येत असताना अपघात झाला. त्यांच्या गाडीत त्यांचे अंगरक्षक होते शिवाय मागे पोलीस पथकाची गाडी देखील होती. डंपरने जोराची धडक दिल्याने गाडीचे देखील मोठे नुकसान झाले आहे.   अपघात होताच जखमींना जळगावला हलविले व प्राथमिक उपचार करून घरी सोडण्यात आले.  हा अपघात करणारा डंपरचालक मात्र डंपर जागेवरच सोडून पळून गेला आहे. अपघात तसा मोठाच होता परंतु केवळ नशिबानेच दोन आमदार वाचले असून त्यांच्यासह त्यांच्या गाडीतील सगळेच जखमी झाले आहेत. या घटनेने परिसरात  मोठी खळबळ उडाली.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !