BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

९ फेब्रु, २०२३

आमदार शहाजीबापू पाटील यांच्या ताफ्यात अपघात, एकाचा मृत्यू !

 



शोध न्यूज : सांगोल्याचे शिंदे गटातील आमदार शहाजीबापू पाटील यांच्या ताफ्यातील पोलीस गाडीला झालेल्या अपघातात एकाच मृत्यू झाला आहे तर एक जखमी झाला आहे. 


मागील काही काळापासून लोकप्रतिनिधींच्या वाहनाला होणारे अपघात चिंता वाढविणारे ठरले आहेत. अशा अपघातात आमदार विनायक मेटे युंचे निधन झाले आहे तर अन्य काही आमदार जखमी झालेले आहेत. सातत्याने लोकप्रतिनिधींच्या वाहनांना अपघात होत असल्याने चिंता व्यक्त केली जात असताना आज सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्या ताफ्यातील पोलीस वाहनाचा अपघात झाला आहे. समोरून आलेला दुचाकीस्वार थेट या पोलीस गाडीवर येवून आदळल्यामुळे हा अपघात झाला आहे. (MLA Shahajibapu Patil's convoy police van accident)या अपघातात एकाचा मुत्यू झाला तर एक जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. पोलीस गाडीवर दुचाकी आदळल्याने दुचाकीच्या समोरच्या बाजूचा चक्काचूर झाला आहे.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या शिबिरासाठी आ. शहाजीबापू पाटील हे नाझरे येथे गेले होते. तेथील कार्यक्रम आटोपून ते सांगोल्याकडे येत होते. त्यावेळी माळवाडी नाझरा येथे ही दुर्घटना घडली. आ. पाटील यांच्या वाहनापुढे पोलिसांचे संरक्षक वाहन (एम एच १४ डी एम ९४४०) होते. ही वाहने जात असताना एक दुचाकीस्वार (एम एच ४५ एजे ६३३०) चुकीच्या दिशेने येत थेट  पोलीस वाहनावर गेला त्यामुळे हा अपघात झाला आहे. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून दुसरा जखमी असला तरी त्याची प्रकृती अत्यवस्थ असल्याची माहिती हाती येत आहे. अपघातात मृत्यू झालेल्याचे नाव अद्याप समजले नाही तथापि पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला आहे. 




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !