शोध न्यूज : आनंदी वातावरणात विवाहाचा सोहळा सुरु असताना आणि नवरदेवाच्या गळ्यात वरमाला घालताच मंडपातच नवरीचा मृत्यू झाल्याची अत्यंत करुण घटना घडली.
विवाह म्हटलं की एक मंगलमय सोहळा असतो, केवळ आणि केवळ आनंदच ओसंडून वाहत असतो, सजलेला लग्नमंडप, सनई चौघडे यांचे मधुर सूर आणि नवरा नवरीच्या नव्या जीवन पर्वाला होणारी सुरुवात ! मंडपात अवघे वातावरण प्रसन्नतेने भरून गेलेले. मोठ्या उत्साहात लग्नसोहळा सुरु असताना वधू वर परस्परांच्या गळ्यात पुष्पहार घालण्यासाठी उठले. दोघे एकमेकांच्या समोर आले. नवरदेवाने नवरीच्या गळ्यात पुष्पहार घातला आणि नवरीनेही वरच्या गळ्यात वरमाला घातली. वऱ्हाडी मंडळीनी टाळ्या वाजवल्या. वधू वरांचे माता पिता हा सगळा सोहळा डोळ्यात साठवत होते. आनंद ओसंडून वाहात असतानाच क्षणार्धात या आनंदाचे रुपांतर प्रचंड दु:खात झाले. वरमाला घातल्यानंतर नवरी मंडपातच मृत्युमुखी पडली असल्याची दु:खद घटना लखनौमध्ये घडली.
भदवाना गावातील हा प्रसंग प्रत्येकाचे काळीज भेदून गेला. नव्या जीवनाची सुरुवात होण्याआधीच नवरीच्या आयुष्याचा असा अचानक शेवट झाला. नवी नवरी शिवांगी हिने वऱ्हाडी मंडळीच्या साक्षीने आणि भरलेल्या मंडपात अखेरचा श्वास घेतला. नवरदेव विवेकच्या गळ्यात शिवांगीने वरमाला टाकली आणि दुसऱ्याच क्षणी ती खाली कोसळली. अचानक काय झाले म्हणून सगळे वऱ्हाडी मंडळी धावले. शिवांगीला तातडीने रुगणालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासले परंतु आधीच तिचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. नवरदेवाला या घटनेचा जबर धक्का बसला आणि अवघ्या आनंदी सोहळ्यावर दु:खाचे सावट पसरले. लग्नात अनेक विघ्न येत असतात पण अशा प्रकारच्या घटना घडल्याचे सहसा ऐकिवात नसते. अशा आनंदाच्या क्षणी अशी घटना घडल्यावर काय परिस्थिती निर्माण होऊ शकते याची सहज कल्पना येवू शकते.
नवरी मुलगी काही दिवसांपासून आजारी होती असे गावकरी सांगत होते पण हृदयासंबंधी तिची काहीच तकरार नव्हती. त्यामुळे अचानक असा प्रकार कसा होऊ शकतो हा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता. असा प्रकार अतिउत्साहामुळे देखील होऊ शकतो असे डॉक्टरांनी सांगितले. (Very sad! The bride died in the wedding hall!) अॅड्रेनिरिल हार्मोनची जास्त प्रमाणात निर्मिती होते, आणि त्यामुळे हृदयाचे ठोके वाढतात. सामान्य हृदय गती ही ७० ते १०० अशी असावी लागते परंतु अति उत्साहात किवा दु:खाच्या प्रसंगी ही गती २०० ते ३०० पर्यंत जाते. अशावेळी अवघ्या वीस ते तीस सेकंदात मृत्यू ओढवतो अशी माहिती लोहिया कार्डिओलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. भुवन तिवारी यांनी दिली. अति आनंद देखील कसा जीवावर उठू शकतो हेच या घटनेने दाखवून दिले आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !