BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

९ ऑक्टो, २०२२

चिन्ह गोठवल्यानंतर उद्धव ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया समोर !

 



शोध न्यूज : निवडणूक आयोगाने धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यानंतर शिवसेनेची दोन शब्दातील प्रतिक्रिया समोर आली असून शिवसैनिक देखील भाराऊन गेले आहेत. सोशल मीडियावर मात्र भाजपच्या विरोधात आक्रमक फैरी झडू लागल्या आहेत.


शिवसेनेतून फुटून बाहेर गेलेल्या एकनाथ शिंदे आणि चाळीस आमदार यांच्यात आणि शिवसेनेत जोरदार संघर्ष सुरु झाला आणि तो आता अधिक टोकाला जाताना दिसत आहे. सर्वोच्च न्यायालयात लढा सुरूच आहे परंतु निवडणूक आयोगाने काल चार तासांच्या बैठकीनंतर धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह तात्पुरत्या स्वरुपात गोठवले आहे आणि शिवसेना हे नाव वापरण्यास देखील मनाई केली आहे. याचे प्रचंड पडसाद उमटू लागले आहेत. सोशल मीडियावरून सामान्य लोकांच्या अत्यंत जहाल प्रतिक्रिया उमटत असून सर्वसामान्य लोकांना देखील हे आवडलेले नसल्याचे दिसत आहे . मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि चाळीस आमदार यांच्यावर तर रोष व्यक्त केला जात आहेच पण त्यापेक्षाही भाजपची खेळी म्हणून याकडे पाहिले जात आहे. 'बाळासाहेबांचे विचार पुढे नेत आहोत असे सांगणाऱ्या शिंदे गटानेच शिवसेना संपवायचा प्रयत्न केला आहे' इथपासून 'शिंदे गटाला पुढे करून भाजपला हेच साधायचे आहे' इथपर्यंत मते व्यक्त केली जात आहेत. 


निवडणूक चिन्ह गोठविल्याचा निर्णय शिवसैनिकांच्या तर अत्यंत जिव्हारी लागला आहे. शिवसेनेला धक्का देणाराच हा निर्णय आहे परंतु संकटात शिवसेना कधी खचून जात नाही हा देखील शिवसेनेचा इतिहास आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची काय प्रतिक्रिया येतेय याकडे राज्याचे लक्ष होते आणि ठाकरे यांची अवघ्या दोन शब्दांत आपला इरादा स्पष्ट केला आहे. यामुळे शिवसैनिकांचे मनोबल प्रचंड उंचावलेले आहेच परंतु शिवसैनिक भारावले देखील आहेत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी इन्स्टाग्रामवरून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतचा एक फोटो त्यांनी शेअर केला आहे. या फोटोखाली दोन शब्दाची कॅप्शन दिली असून त्यात प्रचंड आत्मविश्वास दिसत आहे. 'जिंकून दाखवणारच ' एवढ्या दोन शब्दात ठाकरे यांनी सगळे काही सांगितले आहे. बाळासाहेबांचा हा फोटो पाहून  शिवसैनिक भारावून जात आहेत. 


निवडणूक आयोगाने काल रात्री उशिरा निवडणूक चिन्हांबाबत निकाल दिल्यानंतर उद्धव ठाकरे यांची ही पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. दोन शब्दातील ही प्रतिक्रिया प्रचंड बोलकी आणि विश्वासक ठरली आहे. (Uddhav Thackeray's first reaction after freezing the symbol) समोरून काही घडत असले तरी आपली शस्त्रे खाली न टाकता ती अधिक परजली जात आहेत हेच यातून दिसू लागले आहे. ही पोस्ट पाहून शिवसैनिक भारावले गेले असून "साहेब, आम्ही तुमच्यासोबत आहोत" असा प्रतिसाद शिवसैनिकांनी आणि राजकारणाशी संबंधित नसलेल्यानीही दिला आहे. 


हा तर निर्लज्ज प्रकार !

युवा सेनेचे अध्यक्ष आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी ट्विट करून आक्रमक शब्दात शिंदे गटावर हल्ला चढवला आहे. "खोकेवाल्या गद्दारांनी शिवसेनेचे नाव आणि निवडणूक चिन्ह गोठवण्याचा निर्लज्ज आणि नीच प्रकार केला आहे, महाराष्ट्रातील जनता हे सहन करणार नाही, लढणार आणि जिंकणारच, आम्ही सत्याच्या बाजूने ... सत्य मेव जयते !" असे ट्विट करून त्यांनीही बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा एक फोटो शेअर केला आहे.   


उद्यापर्यंतची मुदत !

निवडणूक आयोगाने अंधेरी पोट निवडणुकीसाठी दोन्ही गटाला धनुष्यबाण हे चिन्ह वापरता येणार नसल्याचा निर्णय घेतला आहे, शिवसेना हे नाव वापरण्यास देखील मनाई करण्यात आली आहे तर अंधेरी निवडणुकीसाठी चिन्ह निवडण्याबाबत उद्या दुपारी एक वाजेपर्यंतची मुदत दिली आहे.


शिवसेनेने मागितले --

निवडणूक आयोगाने चिन्ह आणि नाव गोठविल्यानंतर शिवसेना आता नव्या नावाची मागणी करणार असून 'शिवसेना बाळासाहेब ठाकरे' हे नाव आम्हाला द्या; अशी मागणी उद्धव ठाकरें यांनी निवडणूक आयोगाकडे केली असल्याची ताजी माहिती येत आहे. 


अधिक बातम्यांसाठी येथे क्लिक करा !    



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !