BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१२ सप्टें, २०२२

उद्योगमंत्री उदय सामंत यांना जाळून मारण्याची धमकी !

 



शोध न्यूज : शिवसेनेतून शिंदे गटात दाखल झालेले उद्योगमंत्री उदय सामंत यांना थेट जाळून मारण्याचीच धमकी एका आंदोलकाने दिल्याने राजकारणात प्रचंड खळबळ उडाली आहे. 


शिवसेनेतून फुटून एकनाथ शिंदे यांच्या गटात गेलेल्या बंडखोर आमदारांना स्थानिक पातळीवर आपल्या मतदारसंघात प्रतिकूल परिस्थितीला तोंड द्यावे लागत असल्याचे दाखविणाऱ्या घटना सतत पुढे येत आहेत. त्यामुळे या आमदारांची बंडखोरी लोकांना रुचलेली नाही याचेच प्रदर्शन होत आहे . बंडखोरी करून मंत्रीपद मिळवले असले तरी आपल्या मतदारसंघात त्यांचा सभांना शंभर दीडशे लोक उपस्थित राहतात आणि समोरच्या खुर्च्या तशाच रिकाम्या राहतात हे काही दिवसांपूर्वीच दिसून आले. सच्चे शिवसैनिक हे या बंडखोर आमदारांच्या विरोधात प्रचंड आक्रमक आहेत त्यामुळे यांना पुढची निवडणूक ही मोठ्या आव्हानाची असणार आहेच. राज्यातील राजकारणात मोठे प्रदूषण झाले असून सामान्य जनतेच्या समस्यांचा विषय यापुढे गौण ठरू लागला आहे. 


राज्य सरकारमधील शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांच्यावर पुण्यात अलीकडेच हल्ला झाला होता. परंतु आता त्यांच्या कोकणातच त्यांना जाळून ठार मारण्याची धमकी जाहीरपणे देण्यात आली आहे. अर्थात या धमकीमुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. आजवर मंत्र्यांवर टीका झाल्या आहेत पण त्यांना थेट जाळून मारण्याची भाषा याआधी कधीही झाली नाही. या भाषेतूनच धमकी देणाऱ्याच्या मनातील संताप जाणवत असून ही धमकी शिंदे गटातील एका मंत्र्यांना देण्यात आली आहे. राजापूर येथे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या दौऱ्यात रिफायनरी विरोधक जोशी नावाच्या एका नेत्याने ही धमकी दिली. विशेष म्हणजे पोलिसांच्या उपस्थितीत ही घटना घडली. चक्क उद्योग मंत्री उदय सामंत यांना जाळून ठार मारण्याची धमकी या आंदोलकाने दिली आहे. एखाद्या मंत्र्यांना जाळून मारण्याची धमकी दिल्याचे उदाहरण या आधी किमान महाराष्ट्रात तरी घडले नाही. 


जोशी नामक नेत्याचा धमकीचा हा व्हिडीओ देखील आता वेगाने व्हायरल होऊ लागला आहे. (Industry Minister Uday Samant threatened to burn to death)  प्रकरण गंभीर असल्याने पोलीस देखील अलर्ट मोडवर आलेले असून कोकण परिक्षेत्र विशेष पोलीस महानिरीक्षक संजय मोहिते यांनी स्वत: या प्रकरणात लक्ष घातले आहे तर रत्नागिरी जिल्हा पोलीस प्रमुखांनी याबाबत मंत्री उदय सामंत यांच्याशी चर्चा केली आहे. या प्रकरणाची चौकशी अत्यंत वेगाने सुरु झाली आहे.  


अशी होती धमकी !
"आम्ही काही अतिरेकी नाही, कायदा नावाची काही गोष्ट आहे की नाही, कुणीही कंपन्या उघडतो ... कुठला तरी मंत्री सांगतोय .... त्या उदय सामंतला जाळून टाकू आम्ही... काय माहिती देतोय ...दोन हजार नऊशे एकराची मालकी आहे, मालकी बिलकी गेली खड्ड्यात.... आमच्या जागा आणि आमचे गाव आहे, कुणाचे काहीही खपवून घेणार नाही. पंचक्रोशी आम्हाला पाहिजे, आमची जागा आम्हाला पाहिजे, आमच्या पंचक्रोशीत कुणी पाय ठेवला तर पाय तोडून हातात देवू .. आंदोलनावर गोळीबार झाला तर पहिली गोळी हा अप्पा जोशी घेईल" 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !