BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

६ ऑग, २०२२

निर्दयी ! दहा महिन्याच्या पुतण्याला दिले विहिरीत फेकून !


 

सातारा : भावावर असलेल्या रागातून आपल्याच अवघ्या दहा महिन्याचा पुतण्याला विहिरीत फेकून देवून त्याचा जीव घेतल्याची क्रूर, निर्दयी घटना साताऱ्यातील  कोडोली येथे घडली आहे. 


नात्यांचे बंध परस्पराशी घट्ट असतात पण कधी कधी नात्यांवर असलेला विश्वास उडण्याची घटना आपल्या आजूबाजूला घडत असते. मुलगा आपल्या जन्मदात्यांचा जीव घेतो तर सख्खे भाऊ देखील परस्परांचे पक्के वैरी होताना दिसतात. भावकीतील वाद तर शत्रूपेक्षा अधिक टोकाचा आणि घातक असल्याचे अनकेदा अबुभवाला येत असते. शेती, जमीन जुमला, वाटणी यासाठी भाऊबंदकीत वाद होतात आणि परस्परांच्या जीवावर देखील उठतात. सातारा जिल्ह्यात मात्र अत्यंत सामान्य कारणासाठी आपल्या भावाच्या मुलाचा म्हणजे आपल्याच दहा महिने वय असलेल्या पुतण्याचा चुलत्याने थेट जीव घेतला असल्याचे समोर आले आहे.  


लहान असलेल्या भावाने मोठ्या भावाच्या अवघ्या दहा महिन्याच्या बाळाला दुकानात घेवून जात असल्याचे दाखवले. तसे सांगूनच आपल्या पुतण्याला उचलून बाहेर घेवून गेला आणि सातारा - रहिमतपूर रस्त्यालगत असलेल्या एका विहिरीजवळ पोहोचला. तेथे गेल्यावर हा निर्दयी चुलत्याने दहा महिन्याच्या पुतण्यास थेट विहिरीत फेकून दिले. एवढ्यावर हा थांबला नाही तर त्याने आपल्या भावाला फोन करून या घटनेची माहिती देखील दिली. भावाच्या सांगण्यावर कुणाचाच विश्वास बसलास नाही परंतु जेंव्हा सत्य प्रकाशात आले तेंव्हा कुटुंबालाच मोठा धक्का बसला. कुटुंबीयांनी तातडीने या घटनेची माहिती पोलीसाना कळवली. 


घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी पुढील कार्यवाही सुरु केली. पुतण्याचा जीव घेवून चुलता तेथून पसार झाला होता आणि विहिरीत टाकलेल्या बाळाचा प्राण विहिरीतच गेला होता. या घटनेने परिसरात एकच खळबळ आणि प्रचंड हळहळ व्यक्त होऊ लागली होती तर दुसरीकडे त्या निर्दयी भावाबद्धल संताप व्यक्त होत होता. (An uncle killed his ten month old nephew) नात्याला हा मोठा काळिमा लागल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत राहिल्या. दरम्यान पोलिसांनी तातडीने चक्रे फिरवत काही तासात या क्रूरकर्मा भावाला बेड्या ठोकल्या. सातारा शहर पोलिसात अक्षय सोनवणे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

   

म्हणून हे पाप केले !

पोलिसांनी पकडल्यानंतर आरोपी अक्षय सोनवणे याने  या कृत्याची कबुली दिली. आपले आई वडील मोठ्या भावाचेच कौतुक करतात आणि आपल्याकडे मात्र वाईट दृष्टीने पाहतात याचा मनात राग होता म्हणून आपण हे कृत्य केले असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. काहीही संबंध नसताना आणि हे जग कळण्याच्या आधीच दहा महिन्याच्या बाळाला मात्र हे जग सोडण्याची वेळ आली. 



  • अधिक बातम्यांसाठी       येथे क्लिक        करा !


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !