BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

११ ऑग, २०२२

अबब ... साडे चार लाखांचा जुगार आणि पोलिसांची धाड !

 


मंगळवेढा : तालुक्यात जुगारी मंडळींचे प्रताप कमी व्हायला तयार नसून पुन्हा एकदा दोन जुगार अड्ड्यावर जवळपास साडे चार लाखांचा ऐवज हस्तगत करण्यात आला असून पोलिसाची धाड पडताच काही जुगारी निसटले तर काहींच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत. 


मंगळवेढा शहर आणि तालुका जुगरीच्या बाबतीत भलटाच प्रसिद्ध आहे. येथे वर्षानुवर्षे जुगार खेळण्याचे एक अफलातून वेड आहे. जागा मिळेत तेथे जुगरीचे डाव मांडतात आणि दिवसरात्र येथेच रममाण होतात. कुणी शेतात डाव मांडते तर कुणी जमेल तशी आडोशाची जागा शोधत असते. अशा जुगारी मंडळींवर मंगळवेढा पोलीस सतत कारवाई करतात परंतु जुगार खेळण्याचे इथले वेड जराही कमी होताना दिसत नाही. मंगळवेढा तालुक्यातील बठाण येथे दोन जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकली आणि ४ लाख ४१ हजार २७० रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. या कारवाईने जुगारी मंडळीत काहीसा धसका निर्माण झाला आहे. 


मंगळवेढा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणजित माने यांना बठाण इथे सुरु असलेल्या जुगार अद्द्याबाबत गोपनीय माहिती मिळाली. पिंटू कोळी याच्या हॉटेलच्या मागच्या बाजूस काही लोक तिरट नावाचा जुगार खेळात असल्याची ही पक्के माहिती मिळताच त्यांनी सदर ठिकाणी कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार पोलिसांनी या ठिकाणी धाड टाकली असता काही लोक गोलाकार बसून जुगार खेळत असल्याचे पोलिसांना आढळून आले. पोलिसांनी अंकुश चिंतू शिंदे आणि रफिक महमंद मुलाणी याना पकडले आणि त्यांची तपासणी केली असता दुचाकी तसेच रोख रक्कम मिळून २ लाख ३० हजार ४८० रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला. बाकीचे लोक येथून निसटले. 


पोलिसांनी दुसऱ्या एका क्लबवर छापा टाकला असता येथे शत्रुघ्न उर्फ पिंटू विठ्ठल कोळी, श्रीमंत मसाजी भालेराव, ज्ञानेश्वर औदुंबर बेदरे याना ताब्यात घेतले. या ठिकाणी पोलीस येताच जुगारी मंडळींचे धाबे दणाणले आणि ते सैरावैरा पळत सुटले, पोलीस येताच ज्ञानेश्वर तुकाराम बाबर, किसन विलास शिंदे, कल्याण नागनाथ बाबर, नेताजी जालिंदर शिंदे, गुंडोपंत भानुदास बाबर , महेश विठ्ठल सुतार हे सहा जण पोलिसांना पाहताच येथून पळून गेले आहेत. येथेही २ लाख १० हजार ७९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ या नुसार घनः दाखल करण्यात आला आहे. 


पोलिसांच्या कारवाई होत असल्या तरी देखील चोरून आणि जमेल तशा आडोशाला मंगळवेढा तालुक्यात मोठ्या प्रमाणात जुगार खेळला जातो. पोलिसांच्या अशा कारवाई झाल्या की तेवढ्यापुरते जुगारी धसका घेतात आणि (Police raid on gambling den) पुन्हा काही दिवसात जुगाराचा खेळ जोमाने सुरु झाल्याचा दिसतो.        


  • अधिक बातम्यांसाठी येथे क्लिक करा !


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !