BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२५ ऑग, २०२२

सर्वाधिक दुषित पाणी पंढरपूर, माढा तालुक्यात !

 


शोध न्यूज : पंढरपूर तालुक्यातील ५३ गावांचे पाणी दुषित असल्याची बाब समोर आल्यानंतर आता माढा तालुक्यात देखील अशी ५१ गावे असून जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न ऐरणीवर आला आहे.


सोलापूर जिल्ह्याच्या बाबतीत एका धक्कादायक बाब समोर आली असून सोलापूर जिल्ह्यातील तब्बल २४२ गावे आजही दुषित पाणी पितात. हा प्रकार पाण्याच्या तपासणीतून आढळून आला आहे.  यात पंढरपूर तालुक्यातील सर्वाधिक म्हणजे ५३ गावांचा समावेश असून माढा तालुक्यातील ५१ गावे आहेत.  भू जल सर्वेक्षणातून ही धक्कादायक माहिती समोर आली असून नळ पाणीपुरवठा होत असला तरी दुषित पाण्याला शुद्ध करण्याची यंत्रणा या गावांत उपलब्ध नाही त्यामुळे आहे तसेच पाणी प्यावे लागत आहे आणि त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका उत्पन्न होत आहे. 


सतत दुषित पाणी पिण्यात आल्यास पोटाचे, हाडांचे आणि किडनीचे आजार उद्भवतात. त्यामुळे शुद्ध पाणी पिणे हे आरोग्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे परंतु गावागावात मिळेल तसे पाणी पिण्याशिवाय पर्याय नसतो. कधी नदी नाल्यातले तर कित्येकदा साठलेले पाणी पिले जाते. अनेक लोक पिण्याच्या पाण्याबाबत जागरूक नसतात आणि कुठेही कसलेही पाणी पितात, त्याचा परिणाम आरोग्यावर होत असतो. 
भूजल विभागाने केलेल्या पाणी नमुना तपासणीत ही बाब समोर आली असून टीडीएस, लोह, पीएच, क्लोराईड, सल्फेट आणि हार्डनेस हे आरोग्य विभागाने निश्चित केलेल्या क्षमतेपेक्षा अधिक प्रमाणात असल्याचे आढळून आले आहे.   


सोलापूर जिल्ह्यातील अकरा तालुक्यातील प्रत्येक गावातील पाण्याचे नमुने भूजल विभागाने घेतले होते. एकूण ९ हजार ६८३ नमुने घेण्यात आले आणि यातील ९०८ नमुने चिंताजनक आढळून आले आहेत. या तपासणीत अत्यंत धक्कादायक बाबी दिसून आल्या असून असे पाणी गावागावातील नागरिक प्राशन करीत आहेत. एकूण २४२ गावातील पाण्याच्या नमुने सदोष आढळून आले आहेत. (Most polluted water in Pandharpur, Madha taluk) या पाण्याचा टीडीएस दोन हजाराहून अधिक तर लोहाचे प्रमाणही एक मिलीग्रॅमपेक्षा अधिक आढळून आले आहे. पीएच, अल्कालीनिटी, सल्फेट, क्लोराईड या बाबी देखील क्षमतेपेक्षा अधिक दिसल्या असून या पाण्यातच नागरिकांच्या आजाराचे मूळ कारण असल्याचे दिसून येत आहे. 


माढा तालुक्यातील गावे 

दुषित पाणी आढळण्यात पंढरपूर तालुक्यातील ५३ गावे आणि माढा तालुक्यातील ५१ गावांचा समावेश आहे. माढा तालुक्यातील टेंभुर्णीसह शेवरे, शिंगेवाडी, सुरळी, तडवळे, टाकळी तांबवे, वेताळवाडी, वडाचीवाडी, वाडोली, वडशिंगे, वरवडे तुळशी, उंडेगाव, उपळवाटे,  पिंपळखुंटे, पिंपळनेर, रिधोरे, रोपळे कव्हे, अकोले खुर्द, अकुंभे, आलेगाव बु, बैरागवाडी, बावी,  कुर्डू, लोणी, महादेववाडी, महातपूर, मानेगाव, म्हैसगाव, बिटरगाव, चव्हाणवाडी, दहिवली, दारफळ, घोटी, जाधववाडी, निमगाव, पापणस, परिते, परितेवाडी,, रूई, शेडशिंगे,  कन्हेरगाव, खवे, केवड, खैराव, खैरेवाडी, कुंभेज, मिटकळवाडी, मोडनिंब, मुंगशी या गावांच्या पाण्याचे नमुने दुषित अर्थात अपायकारक आढळून आले आहे. 


पंढरपूर तालुका

पंढरपूर तालुक्यात ५३ गावात दुषित पाणी आढळून आले आहे. गोपाळपूर, सुस्ते, तारापूर, फुलचिंचोली, पोहोरगाव, करकंब, गुरसाळे, होळे, जाधववाडी,  कौठाळी, खेड भाळवणी, खेड भोसे, सुगाव खुर्द, पिराची कुरोली,  पुळूज, पुळूजवाडी, रांझणी, शंकरगाव, शेळवे, शिरढोण, अनवली, अव्हे, बाभूळगाव, बार्डी, भंडीशेगाव, भटुंबरे , बोहाळी, चळे, चिलाईवाडी, चिंचोली भोसे, उजनी, ओझेवाडी, पटवर्धन कुरोली, पेहे,  सिद्धेवाडी,  देगाव, देवडे, एकलासपूर, कोंढारकी, कोर्टी, उपरी, विटे, वाखरी, बिटरगाव, टाकळी गुरसाळे, टाकळी, तावशी, तुंगत, मगरवाडी, मुंढेवाडी, नेमतवाडी, या गावातील पाण्याचे नमुने दुषित आढळले आहेत. 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !