BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२५ ऑग, २०२२

पत्नीला रेल्वेखाली ढकलणारा नवरा सापडला !




शोध न्यूज : झोपेत असलेल्या पत्नीला उठवून काही कळायच्या आत धावत्या रेल्वेखाली टाकून पळून जाणारा नराधम नवरा पोलिसांच्या हाती लागला असून सीसीटीव्ही फुटेजमुळे जलदगतीने हा तपास लागला.  


रेल्वे रुळावर एका महिलेचा छिन्न विच्छिन्न झालेला मृतदेह सकाळच्या वेळेस आढळून आला होता. हा अपघात कसा झाला ? रेल्वेखाली मृत झालेली ही महिला कोण? याबाबत काहीच माहिती मिळू शकत नव्हती. हा अपघात आहे की आत्महत्या आहे याचेही काही उत्तर लोहमार्ग पोलिसांकडे नव्हते. अखेर या पोलिसांनी रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही फुतेजची पडताळणी केली असता पोलिसांना धक्काच बसला. हा अपघात नव्हता की आत्महत्याही नव्हती. हा तर थंड डोक्याने केलेला अत्यंत क्रूर असा खून होता हेच पोलिसांच्या निदर्शनास आले. 

पहाटेच्या वेळेस पतीने झोपेत असलेल्या आपल्या पत्नीला उठवले. या स्थानकावर न थांबणारी एक रेल्वे येत होती याचा अंदाज घेत त्याने पत्नीला उठवले आणि काही क्षणात रेल्वे आली. राक्षसी पतीने क्षणाचाही विलंब न लावता रेल्वे अगदी जवळ येताच पत्नीला फलाटावरून रेल्वेपुढे ढकलून दिले. पत्नीला ढकलताच रेल्वेने तिचे तुकडे केले. घाईघाईने पतीने झोपलेल्या आपल्या दोन मुलांना उठवले आणि त्यांना घेवून तो तेथून वेगाने पसार झाला. हा घटनाक्रम सीसीटीव्ही फुटेजमधून समोर आला. 

 
पोलिसांनी या घटनेबाबत अज्ञात पतीच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला असून या आरोपीचा शोध सुरु करण्यात आला आहे. दोन लहान मुले असलेल्या आईचा आणि आपल्या पत्नीचा झोपेत अशा प्रकारे खून करण्याचा हा प्रकार हादरवून सोडणारा ठरला आहे. 
वसई रोड रेल्वे स्टेशनवर एक कुटुंब रात्रीच्या वेळेस फलाट क्रमांक पाच वर झोपले होते. पती, पत्नी आणि त्यांची दोन मुले होती. हे कुटुंब कोठून आले होते आणि कुठे जाणार होते याचा काहीच अंदाज नव्हता. सीसीटीव्ही फुटेजमुळे एकूण घटनेवर मात्र प्रकाश पडला होता. 


फुटेजच्या आधाराने रेल्वे पोलिसांनी तपास सुरु केला आणि रेल्वेच्या गुन्हे शाखेनेही या गुन्ह्याचा समांतर तपास हाती घेतला. पोलिसांनी या आरोपीची माहिती काढणे सुरु केले तेंव्हा ही व्यक्ती भिवंडी येथील टेमघर परिसरातील असल्याची माहिती मिळाली. त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी सापळा लावला. अखेर हा नराधम त्याच्या घरातच पोलिसांना सापडला. त्याच्याकडे चौकशी केली तेंव्हा त्याने या कृत्याची कबुलीही दिली. चारित्र्याच्या संशयावरून होत असेलेल्या वादातून हे कृत्य केले असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. 



महाभयंकर कृत्य करणारा हा माथेफिरू रंगकामाचा व्यवसाय करीत असून त्याचे नाव मेहंदी हसन असे आहे तर त्याच्या मयत पत्नीचे नाव नुरीनिसा असे आहे. रेल्वेसमोर ढकलून जीव घेतलेल्या नुरीनिसाचे वय अवघे ३३ वर्षांचे होते. घटना घडण्याआधी त्यांच्यात भांडण झाले होते. हसन हा पत्नीला सतत फोन करून 'तू परत ये' असे सांगत होता. अखेर तिने आपण वसई स्टेशनवर असल्याचे सांगितले. (The husband who pushed his wife under the train was arrested)  त्यानंतर हसन तेथे पोहोचला आणि पहाटे हे महाभयंकर कृत्य केले. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !