BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१२ जून, २०२२

बारावीत कमी गुण मिळाल्याने विद्यार्थिनीची आत्महत्या !

 



बार्शी : बारावी परीक्षेत कमी गुण मिळाल्याने आलेल्या नैराश्यातून बार्शी येथे एका विद्यार्थिनीने आत्महत्या केली असून आत्महत्येचे लोण सोलापूर जिल्ह्यापर्यंत पोहोचले असल्याचे या घटनेने दिसून आले आहे. 


दहावी बारावी परीक्षेत नापास झाल्यामुळे विद्यार्थी आत्महत्या करीत असल्याच्या अनेक घटना समोर येतात परंतु बारावीची परीक्षा पास होऊन देखील निराश झालेल्या आणखी एका विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षेला महत्व आहे पण प्राणापेक्षा महत्वाचे काहीही नसते. तरी देखील विद्यार्थी खचून आत्महत्येसारखे टोकाचे पाउल उचलतात आणि आपले जीवन संपवतात. दहावी बारावी नापास झालेले नंतर डॉक्टर, आयपीएस अधिकारी झाल्याच्या घटना आहेत. परंतु नापास झाले म्हणजे आयुष्यातील सगळे काही संपले असे समजून काही विद्यार्थी आत्महत्या करतात. नापास झाल्यामुळे येणाऱ्या निराशेतून अशा घटना घडतात. भंडारा जिल्ह्यात बारावीच्या एका विद्यार्थिनीने परीक्षेत पास होवूनही आत्महत्या केली आणि आता पुन्हा बार्शी येथे अशीच घटना घडली आहे  (Student Passed exam but Suicide) अशा घटना पालकांची चिंता वाढविणाऱ्या ठरू लागल्या आहेत.


गेल्या काही वर्षांत कुठल्याही परीक्षेत मुलांपेक्षा मुलीचा वरचढ ठरतात. मुलांना मागे टाकत मुली सर्वाधिक बाजी मारतात. बारावीचा निकाल कालच घोषित झाला. आणि लाखनी येथील समर्थ महाविद्यालयाची विद्यार्थिनी मयुरी वंजारी ही पास झाली होती. केवळ अपेक्षित गुण न मिळाल्याने तांदळाला अळी लागू नये म्हणून लावण्याचे विषारी पावडर खाऊन तिने आपले जीवन संपवले. या घटनेनंतर सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथे  देखील अशीच घटना घडली आहे. सृष्टी बोंदर या विद्यार्थिनीने बार्शीत टोकाचे पाऊल उचलत गळफास घेतला. 


उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील देवधानोरा गावाची मुळची रहिवाशी असलेली सृष्टी बोंदर ही मुलगी बार्शी येथे शिक्षण घेत होती. बार्शीतील चैतन्यनगर येथे भाडोत्री खोली घेऊन ती राहत होती. तिने बारावीची परीक्षा दिली होती आणि या परीक्षेत ८५ ते ९० टक्के गुण मिळतील अशी तिची अपेक्षा होती परंतु प्रत्यक्षात तिला ६५ टक्के गुण मिळाले. नुकत्याच लागलेल्या निकालात तिला मिळालेले गुण पाहून ती निराश झाली होती. याच नैराश्येत तिने भाड्याने घेतलेल्या खोलीतच गळफास घेतला आणि आपल्या जीवनाचा शेवट केला. (Student commits suicide due to low marks)ही घटना निदर्शनास आली तेंव्हा प्रचंड हळहळ व्यक्त होऊ लागली आहे. 


पालकांत चिता !

नापास होणारे काही विद्यार्थी आत्महत्या करतात पण आता परीक्षेत पास होऊन देखील अपेक्षित गुण न मिळाल्याने आत्महत्या होऊ लागल्या आहेत त्यामुळे पालकांत चिंतेचे  वातावरण निर्माण होऊ लागले आहे. बारावीची परीक्षा म्हणजे आयुष्यातील शेवटचा पर्याय आहे आणि यापुढे जीवनात काहीच करता येणार नाही असा गैरसमज करून घेतला जात आहे आणि ही बाब प्रचंड चिंतादायक ठरू लागली आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !