BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१२ जून, २०२२

पंढरीच्या विठ्ठलापेक्षा पंतप्रधान मोदींचा फोटो 'मोठा' !

 


पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या देहू दौऱ्यापूर्वीच एक नवा आणि मोठा वाद समोर आला असून पंतप्रधानांच्या स्वागतासाठी उभारलेल्या फ्लेक्सवर विठ्ठलाच्या प्रतिमेपेक्षा मोदींचा फोटो मोठा लावल्याने संतप्त प्रतिक्रीया उमटू लागल्या आहेत. 


पंतप्रधान मोदी यांच्या विविध ठिकाणच्या फोटोबाबत अनेकदा आक्षेप घेतला जातो आणि प्रखर टीका देखील केली जाते. राजकीय टीका तर होताच असते पण सर्वसामन्या माणसाना देखील हे रुचत नाही. इंधनाचे दर सतत भडकत असताना प्रत्येक पेट्रोल पंपावर लावण्यात आलेले नरेंद्र मोदी यांच्या फोटोवर अनेकांनी आक्षेप घेत जोरदार टीका केली होती, अलीकडेच लसीकरणाच्या प्रमाणपत्रावर देखील असलेल्या फोटोबाबत आक्षेप घेतला जात होता आणि टीका देखील होत होती. लसीकरणाच्या प्रमाणपत्रावर फोटो छापता तसे कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या मृत्युच्या दाखल्यावर देखील फोटो छापावेत अशी उपहासात्मक मागणी विरोधकांनी केली होती. आता मात्र पंढरीच्या पांडुरंगापेक्षा मोदींचा फोटो मोठा लावल्याने संताप व्यक्त केला जाऊ लागला आहे. 


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा १४ जून रोजी देहू दौरा आहे. या दौऱ्यात ते देहू येथील संत तुकाराम महाराज यांच्या मंदिराला भेट देणार आहेत आणि तेथील शिळा मंदिराचे लोकार्पण करणार आहेत. पण त्याआधीच या दौऱ्याला वादाचे गालबोट लागले आहे. स्वागतासाठी लावण्यात आलेल्या फ्लेक्सवर पंतप्रधान मोदी यांचा मोठा फोटो आहे तर लाखो करोडो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरीच्या पांडुरंगाचा फोटो लहान आकारात आहे. हे फ्लेक्स पाहून अंकांनी दु:ख व्यक्त केले तर कुणी संताप व्यक्त करीत आहे. भाविक, वारकरी आणि विठ्ठल भक्तांना हा प्रकार सहन होत नसल्याचे दिसत आहे. या फ्लेक्सने अनेकांच्या भावनेला देखील धक्का लागला आहे. 


राष्ट्रवादी कॉंग्रेसने या प्रकारावर जोरदार आक्षेप घेत हा वारकरी सांप्रदायाचा अपमान असल्याचे म्हटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष रविकांत वरपे यांनी या फ्लेक्सचे फोटो ट्वीट केले असून भाजपवर हल्ला चढवला आहे. (Bigger photo of PM Modi than Vitthal in controversy)भाजपचे पिंपरी चिंचवड येथे जाणीवपूर्वक मोदी यांचा फोटो पांडुरंगापेक्षा मोठा दाखवून वारकरी सांप्रदायाचा अपमान केला आहे असा आरोप राष्ट्रवादीकडून करण्यात येत आहे. 

भाजपचे हे पाप

पिंपरी चिंचवड शहर भारतीय मोदी यांना विठ्ठलापेक्षाही मोठे दाखवण्याचे पाप केले आहे, विटेवर उभ्या असलेल्या विठ्ठलापेक्षा कुणी मोठा नाही, सांप्रदायाची बदनामी वारकरी सांप्रदाय खपवून घेणार नाही, भारतीय जनता पक्षाने वारकरी संप्रदायाची माफी मागावी असे आणखी एक ट्वीट राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष रविकांत वरपे यांनी केले आहे. 


स्वागताची जोरदार तयारी 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी देहूत जोरदार तयारी करण्यात आली असून देहू संस्थानच्या वतीने खास डिझाईन केलेली पगडी तुकाराम पगडी आणि उपरणे देवून पंतप्रधान यांचा सत्कार करण्यात येणार आहे. खास रेशमी सिल्क वापरून पगडी तयार करण्यात आली आहे. सुरक्षेची देखील मोठी काळजी घेण्यात आली आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !