BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१२ जून, २०२२

तळीरामांची थेट पोलिसांनाच मारहाण !





बार्शी : सराईत गुन्हेगारात तर पोलिसांचा वचक राहिला नाहीच पण दोन तळीरामांनी थेट पोलिसांनाच मारहाण केल्याची घटना समोर आली असून याप्रकरणी बार्शी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


काही वर्षांपूर्वी पोलिसाला पहिले तर निरपराध व्यक्ती देखील घाबरत होता आणि लांबूनच पळून जात होता. आता गुन्हेगार देखील पोलिसांना घाबरत नाहीत असा अनुभव आहे. अशी परिस्थिती होण्यास पोलीस देखील जबाबदार असून सराईत गुन्हेगारांना तर पोलिसांचे कसलेच भय वाटत नाही अशी दुर्दैवी परिस्थिती आज निर्माण झाली आहे पण बार्शीत तर दोन तळीरामांनी पोलिसांना मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांवर हात उचलण्याची हिम्मत यांच्यात येतेच कुठून हा देखील विचारात टाकणारा सवाल उपस्थित होत आहे. पोलीसही माणूस आहे आणि त्याला आपले काम करावे लागते याचा देखील विचार करणे आता अनेकांनी  सोडून दिल्याचे दिसत आहे.  पोलिसांवर हात उचलण्याची मस्ती येतेच कशी असा प्रश्न अनकेदा पडत असला तरी देखील बार्शीत असा गुन्हा दोन तळीरामानी केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


बार्शी शहरातील सुभाषनगर परिसरात रोटरी क्लबच्या मागील बाजूस ही घटना घडली. या ठिकाणी काही जण दारू पिऊन राडा करीत होते, जोरदार धिंगाणा सुरु होता. शिवीगाळ, आरडाओरडा सुरु होता. या प्रकारची माहिती पोलिसांच्या कानावर गेली. सहाय्यक पोलीस शिरसट आणि महेश माने हे त्या ठिकाणी गेले तेंव्हा त्यांना हा सगळा प्रकार आपल्या डोळ्यांनी पाहायला मिळाला. मद्यधुंद अवस्थेत दोघे जण शिवीगाळ करीत होते. पोलिसांनी त्यांना हटकले तेंव्हा पोलिसांना देखील त्यांनी शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. अखेर त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता पोलीस कर्मचारी महेश माने यांना थेट मारहाण करण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक पुढे झाले असता त्यानाही ढकलून देण्यात आले आणि शिवीगाळ करण्यात आली. 


पोलिसांनी रोहित शिंदे आणि वैभव जाधव यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. दोघांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला तेंव्हा वैभव जाधव हा तेथून निसटला आणि पोलिसांनी रोहित शिंदे याला ताब्यात घेतले. (Alcoholics beat up police) शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   

  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !