BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२७ एप्रि, २०२२

रेशन कार्ड परत जमा करा अन्यथा ---

 


मुंबई : रेशन कार्डच्या बाबतीत नियम बदलले असून काही रेशन कार्ड धारकांना आपले कार्ड शासनाकडे जमा करावे लागणार आहे, तसे न केल्यास भलतेच महाग पडू शकते. 


शासनाच्या स्वस्त धान्य दुकानातून धान्य घेण्यासाठी बहुतेक सर्वांकडे रेशन कार्ड अर्थात शिधापत्रिका असते. प्रत्येक घरात रेशन कार्ड असले तरी प्रत्यक्षात त्याचा वापर करून धान्य घेणार नागरिक कमी आहेत. रेशन कार्डचा उपयोग अनेक ठिकाणी होत असल्याने ते बाळगले जाते पण स्वस्त धान्य दुकानात जाऊन त्यावर धान्य उचलले जात नाही परंतु अनेकजण अपात्र असताना देखील शासनमान्य दुकानातून धन्य उचलतात त्यामुळे पात्र आणि गरजूंना धान्य मिळण्यात अडचण निर्माण होत असते. हे प्रकार वाढीला लागल्यामुळे शासनाने रेशन कार्डसंबंधी आता नवे नियम लागू केलेले असून त्यानुसार काही कार्ड धारकांना आपली कार्ड शासन जमा करावी लागणार आहेत. हा नियम न पाळल्यास मोठा दंड तर भरावाच लागणार आहे पण कायदेशीर कारवाईला देखील सामोरे जावे लागू शकते. 


कोरोनाच्या कालावधीत शासनाने गरीब कुटुंबासाठी मोफत धान्य देण्याची योजना आणली आणि ही योजना आजही सुरूच आहे. गरिबाला उपाशी राहण्याची वेळ येऊ नये या उदात्त हेतून ही योजना सुरु केली पण पात्र नसलेले कार्डधारकही या योजनेत घुसखोरी करून लाभ मिळवत आहेत असे शासनाच्या निदर्शनास आले. अपात्र व्यक्तींनी लाभ मिळविल्यामुळे पात्र आणि गरीब नागरिक या योजनेपासून वंचित रहात असल्याचे देखील दिसून आले. त्यामुळे अपात्र व्यक्तींना त्यांची रेशन कार्ड जमा करण्यास सांगण्यात येत आहे. अपात्र व्यक्तीने जर रेशन कार्ड जमा केले नाही तर त्याची चौकशी होऊन कायदेशी कारवाई देखील करण्यात येणार आहे. 

 

अपात्र कोण ?

ज्या कुटुंबाकडे चार चाकी वाहन, ट्रॅक्टर, हार्वेस्टर, ५ केव्ही किंवा त्यापेक्षा अधिक क्षमतेचे जनरेटर, १०० चौरस मीटरचा भूखंड किंवा घर, पाच एकर पेक्षा अधिक जमीन, आयकर भरणारे, एकापेक्षा अधिक शस्त्र परवाना, ग्रामीण भागातील कुटुंबाचे उत्पन्न २ लाख किंवा त्यापेक्षा अधिक तर शहरात कौटुंबिक वार्षिक उत्पन्न ३ लाखाहून अधिक असेल अशा व्यक्तींनी त्यांचे रेशनकार्ड तहसील कार्यालयात जमा करावे लागणार आहे.  


कार्ड जमा न केल्यास --

अपात्र व्यक्तींनी आपले रेशन कार्ड जमा न केल्यास त्याची चौकशी करून सदर कुटुंबावर कायदेशीर कारवाई तर केली जाणार आहेच आणि रेशन कार्ड देखील रद्द करण्यात येणार आहे. (Surrender ineligible ration card) या कुटुंबाने जेंव्हापासून रेशन घेतले आहे तेंव्हापासून सगळी भरपाई देखील करून घेतली जाणार आहे.  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !