BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२० फेब्रु, २०२२

सोलापूर जिल्ह्यात आता उरले फक्त एकशे बहात्तर !

 




सोलापूर : कोरोनाची तिसरी लाट सगळीकडूनच परतीच्या प्रवासाला लागली असून सोलापूर जिल्ह्यात (ग्रामीण भाग )  आता केवळ १७२ सक्रीय रुग्ण उरलेले आहेत. 


कोरोनाच्या दोन्ही लाटेने सोलापूर जिल्ह्याचे, विशेषत: पंढरपूर तालुक्याचे खूप मोठे नुकसान केले आहे. सोलापूर जिल्यात सर्वाधिक बाधित आणि मृत्यू हे पंढरपूर तालुक्यातीलच झाले आहेत. त्यातच कोरोनाची तिसरी लाट आली आणि पुन्हा एकदा मनामनावर दहशत निर्माण झाली होती परंतु ही लाट पहिल्या दोन्ही लाटेसारखी विध्वंसक रुपात आली नाही. आता तर तिसरी लाट परतीच्या प्रवासाला लागली असून मार्च अखेरपर्यंत ती जवळपास समाप्त झालेली असेल. निर्बंध देखील हटले जाऊन मोकळा श्वास पुन्हा घ्यायला मिळेल हा एक मोठा दिलासा लाभताना दिसत आहे. 


 सोलापूर जिल्ह्यात कोरोनाची परिस्थितीत अत्यंत दिलासादायक झाली असून जिल्हा ग्रामीणमध्ये आता केवळ १७२ सक्रीय रुग्ण उरलेले आहेत. येत्या काही दिवसात ही संख्या देखील कमी होणार आहे. 

अक्कलकोट तालुक्यात ८, बार्शी तालुक्यात १९, करमाळा - १३, माढा - १३, माळशिरस - १३, मंगळवेढा - १२, मोहोळ- १७, उत्तर सोलापूर - ६, पंढरपूर- ३७, सांगोला- ३१ आणि दक्षिण सोलापूर तालुक्यात ३ असे १७२ रुग्ण सद्या उपचार घेत आहेत.  अद्यापही सक्रीय रुग्णांची संख्या पंढरपूर तालुक्यातच सर्वाधिक असून सर्वाधिक मृत्यू (६७०) देखील पंढरपूर तालुक्यातच झालेले आहेत. 


पंढरपूर तालुक्याच्या खालोखाल बार्शी तालुक्यातील ५१४  मृत्यूची नोंद झाली आहे. उपचार घेत असलेल्या बहुतेक रुग्णांना कुठल्याही प्रकारची लक्षणे दिसत नसून सोलापूर शहरात ४६ रुग्ण सक्रीय आहेत त्यातील ३० रुग्णावर घरीच उपचार सुरु आहेत.  रुग्णांची कमी होत असलेली संख्या ही सोलापूर जिल्ह्यासाठी दिलासादायक ठरू लागली असून लवकरच जिल्हा कोरोनामुक्त होईल याचे संकेत स्पष्ट झालेले आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !