BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१७ फेब्रु, २०२२

लग्नाची झाली तयारी पण पोलिसच आले घरी !

 



उमरगा : लग्नाची जय्यत तयारी झाली होती, वधुवरांच्या कुटुंबात एक वेगळेच वातावरण होते. दोन्ही कुटुंबांनी परस्परात या लग्नाची बोलणी केली होती त्याप्रमाणे सगळे काही सुरु होते पण अचानक पोलिसच घरी आले सगळ्या रंगाचा बेरंग झाल्याची घटना उमरगा तालुक्यात घडली आहे. 


उमरगा तालुक्यातील कदेर इथल्या एका कुटुंबाने त्यांच्या मुलीचे लग्न निश्चित केले होते. मुलीचे वय १६ वर्षांचे आहे त्यामुळे ती कायद्याने अल्पवयीन ठरते. अल्पवयीन मुलांचा विवाह हा कायद्याने गुन्हा ठरतो. कायद्याने असे लग्न करता येत नाही हे सगळ्यांनाच माहित आहे पण तरी देखील असे विवाह होत असतात. दोन्ही घराच्या संमतीने आणि अत्यंत लपूनछपून असे विवाह उरकले जातात. काही विवाहांची माहिती आधीच पोलिसांना मिळते आणि पोलीस असे विवाह रोखतात. काही विवाहाची माहिती विवाहानंतर पोलिसांना मिळते तर कित्येक बाल विवाह झालेले पोलिसांच्या माहितीपासून दूरच राहतात. 



या विवाहाची कथा मात्र इतर विवाहापेक्षा वेगळी आहे. बालविवाह होत असल्याबाबत गावात कुणकुण लागलेली असतेच. कुणीतरी हितशत्रू याची माहिती हमखास पोलिसांच्या पर्यंत पोहोचवतो. वास्तविक कोणत्याही जागरून नागरिकांनी अशा विवाहाला विरोध करायला हवा आणि ऐकत नसतील तर पोलिसांपर्यंत ही माहिती द्यायला हवी. ग्रामीण भागात मात सहसा असे घडत नाही. आपण कशाला कुणाचे वाईट करायचे ? असा प्रश्न स्वतःलाच विचारून शांत बसतात. गावातील संबंधामुळे अशा बाल विवाहाची बातमी शक्यतो बाहेर येत नाही. पण यावेळी होवू घातलेल्या अल्पवयीन मुलीनेच कुटुंबाचे बिंग फोडले आणि पोलीस थेट घरीच पोहोचले. 



सोळा वर्षीय मुलीला आपल्या लग्नाची माहिती मिळाली होती. घराच्या मंडळीनी आपला विवाह निश्चित केला असल्याची बातमी तिला लागली आणि तिने स्वतःच पोलिसांना फोन करून आपला बालविवाह रोखला आहे. या अल्पवयीन मुलीने पोलिसांना फोन करून या विवाहाची कल्पना दिली आणि प्रशासन खडबडून जागे झाले. तातडीने पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी होणारा बालविवाह रोखला. मुलीच्या पित्याचे समुपदेशन करून त्यांच्याकडून लिहून देखील घेतले गेले. अल्पवयीन मुलीने आपलाच विवाह रोखण्यासाठी केलेल्या धाडसाचे प्रशासनासह गावात देखील कौतुक झाले आणि बाल विवाह रोखण्यासाठी आलेल्या एका अधिकाऱ्याने या मुलीचे शैक्षणिक पालकत्व देखील स्वीकारले   


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !