BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१४ फेब्रु, २०२२

पेट्रोलचे दर सव्वाशे रुपयांच्याही पार होणार !

 


नवी दिल्ली : इंधनाचे दर गगनाला भिडले असल्याचा संताप गेल्या काही वर्षांपासून व्यक्त होत असतानाच पुढील महिन्यात पेट्रोलचे दर १२५ रुपये होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. 


इंधनाचे दर सतत वाढत आहेत. मनमोहन सिंग देशाचे पंतप्रधान असताना पेट्रोल आणि डीझेल तसेच गॅसचे दर आत्तापेक्षा कितीतरी कमी होते. त्या दराविरोधात भारतीय जनता पक्षाने वेळोवेळी आंदोलने केली होती आणि आम्ही सत्तेवर आल्यावर हे दर एकदम कमी करू असे देखील वेळोवेळी सांगितले होते. कर्मधर्म संयोगाने देशात भाजपचे सरकार आले आणि लोक अच्छे दिन येण्याची वाट पाहत राहिले. अच्छे दिन तर नाहीच पण पाहिलेही बरे दिवस निघून गेले आहेत. भाजपच्या सत्ताकाळात महागाईने विक्रम निर्माण केला आहे. इंधनासह प्रत्येक वस्तूंचे दर प्रचंड पटीने वाढलेले आहेत. त्यामुळे लोक आता हेच का अच्छे दिन ? असा सवाल विचारू लागलेले आहेत. सर्वसामान्य माणसाला या महागाईत जगणे कठीण झाले आहे पण भाजपाला आपल्या आश्वासनाचा विसर पडलेला आहे. 


पेट्रोल दर शंभर रुपये झाले तेंव्हाच भारतीयांना धक्का बसला होता पण आता हे दर सव्वाशेच्याही पार जाण्याची चिन्हे आहेत. देशात कुठल्या निवडणूक आल्या की इंधनाचे दर स्थिरावतात आणि निवडणुका संपल्या की या दरांचा एकदम भडका उडतो असे चित्र गेल्या काही वर्षांत अनेकदा पाहायला मिळालेले आहे. सद्या पाच राज्यातील निवडणूक सुरु आहे त्यामुळे पेट्रोल डिझेलचे दर स्थिर आहेत. 


या निवडणुका संपल्या की इंधनाचे दर मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता व्यक्त होऊ लागली आहे. हे दर एवढे वाढतील की सामान्य जनतेचे मोडलेले कंबरडे आणखी मोडून पडेल. आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या दराचा प्रचंड भडका उडाला असल्याने निवडणूक होताच ग्राहकांना मोठा धक्का बसण्याची शक्यता स्पष्ट दिसत आहे.  


नोव्हेंबर महिन्यात केंद्र सरकारने पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात ५ रुपये आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात १० रुपये कपात केली होती. त्यानंतर पेट्रोलियम कंपन्यांनी दर वाढविणे थांबविले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात मात खनिज तेलांच्या किमती प्रचंड वाढलेल्या आहेत. हे दर २०१४ नंतर उच्चांकी पातळीला जाऊन भिडलेले आहेत. त्यामुळे पेट्रोलियम कंपन्यांना दर वाढविण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. पाच राज्यातील निवडणुका असल्यामुळे दर स्थिर असल्याचे दिसत आहे पण निवडणूक संपली की दर वाढीचा धक्का अटळ असून पेट्रोलचा दर प्रतिलिटर १२५ रुपयावर जाऊ शकतो असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.   



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !