मुंबई : फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस महाराष्ट्रातील जवळपास सर्वच निर्बंध हटले जाऊन महाराष्ट्र अनलॉक होण्याचे महत्वाचे आणि मोठे संकेत मिळत आहेत. त्यामुळे लवकरच महाराष्ट्राला दिलासा मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.
कोरोनाच्या पहिला आणि दुसऱ्या लाटेने जगणे आणि मरणेही कठीण केले होते. तिसरी लाट येणार की नाही याबाबत मतमतांतरे दिसून येत होती आणि अखेर कोरोनाची तिसरी लाट चोर पावलाने आली परंतु पहिल्या दोन लाटेसारखा विध्वंस या लाटेने केला नाही. कोरोनाची तिसरी लाट देखील आता परतीच्या मार्गावर असून या आधीच राज्याच्या आरोग्य मंत्र्यांनी दिलासा दिला होता. कोरोनाची तिसरी लाट १५ फेब्रुवारी पासून कमी होण्यास सुरुवात होईल असे सांगण्यात आले होते पण तत्पूर्वीच ही लाट ओसरताना दिसत आहे. हा एक मोठा दिलासा मानला जात आहे. जेवढ्या वेगाने ही लाट आली तितक्याच वेगाने ती परतीच्या मार्गालाही लागली आहे.
राज्याच्या टास्क फोर्सने दिलासा दिलेल्या असतानाच राज्याचे आपत्ती व्यवस्थापन आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देखील महाराष्ट्राला मोठ्या दिलाशाचे संकेत दिले आहेत. नुकत्याच झालेल्या बैठकीत राज्य अनलॉकच नव्हे तर मास्क पासून सुटका करण्याबाबत दोन्ही बाजूनी मंत्रीमंडळाच्या बैठकीत नुकतीच चर्चा करण्यात आली असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. राज्याला अनलॉक करण्यासाठी केंद्र आणि राज्य कोविड टास्क फोर्सकडून सल्ला मागण्यात आला असल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे.
राज्यात कसलेही निर्बंध लागू करण्याची आता गरज उरली नसून आहे त्याच निर्बंधात आणखी शिथिलता आणि सवलत देण्याचे संकेत देखील टोपे यांनी दिले आहेत. जनतेचे स्वतःच कोरोनाला प्रतिबंध करण्याचे आणि बचावात्मक उपायांचे पालन करण्याची गरज आहे असे सांगून आरोग्य मंत्र्यांनी मोठे संकेत दिले असतानाच राज्याचे आपत्त्ती व्यवस्थापन आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी यांनी नागपूर येथे असेच संकेत दिले आहेत. महाराष्ट्र अनलॉकच्या दिशेने वाटचाल करीत असल्याचे वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. केंद्र सरकार आणि टास्क फोर्स यांच्या सल्ल्यानुसारच याबाबत निर्णय जाहीर केला जाईल असे देखील आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलेले आहे.
कोरोनाची तिसरी लाट ओसरत असताना दिलासा मिळू लागला असतानाचा शासनाच्या पातळीवरून निर्बंध हटविण्याच्या हालचालींना गती आलेली दिसत आहे. फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस राज्य पूर्ण अनलॉक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तिसऱ्या लाटेत कोरोना रुग्णांची संख्या वेगाने कमी होते असून राज्यात तिसरी लाट नियंत्रणात येत आहे. अनलॉक करीत असताना चौथ्या लाटेची देखील चिंता आहे त्यामुळे काळजी घेणे आवश्यक ठरणार आहे असे विजय वादेत्तीवर म्हणाले आहेत. कोरोना संपला आहे असे घोषित करू नका असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे परंतु महाराष्ट्रात अनलॉकच्या हालचाली आणि चर्चा सुरु आहेत.
गेल्या पावणे दोन वर्षांपासून कोरोनाने धुमाकूळ घातला असून निर्बंध आणि नियम यांच्यात माणूस गुदमरून गेला आहे. आता तिसऱ्या लाटेने काढता पाय घेतला असल्याने दिलासा लाभत असतानाच शासनाच्या पातळीवर निर्बंधातून सुटका देण्याच्या सुरु झालेल्या हालचाली दिलासा देणाऱ्या ठरल्या आहेत. असे असले तरी केंद्र सरकार काय भूमिका घेतेय यावर सगळे काही अवलंबून आहे. फेब्रुवारी महिना अर्ध्यावर आला असून या महिन्याच्या अखेरीपर्यंत आणखी दिलासादायक बातमी मिळण्याची शक्यता आहे. यासाठी आणखी काही दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !