BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२१ फेब्रु, २०२२

दुसऱ्यांना पाठींबा द्यायचं आता बंद करा - ना. जयंत पाटील

 



सांगोला : इतरांना पाठींबा द्यायची सवयच सांगोला तालुक्याला लागली आहे, ही सवय आता बंद करा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांना केले. 


राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे आज सोलापूर दौऱ्यावर असताना त्यांनी सांगोला तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या 'परिवार संवाद यात्रे' ला आज उपस्थिती लावली. यावेळी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासह अनेक पदाधिकारी आवर्जून उपस्थित होते. रामकृष्ण व्हिला सभागृहात परिवार संवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना त्यांनी आपल्या शैलीत संवाद साधला. सांगोला तालुक्याला नेहमीच कुणालातरी पाठिंबा द्यायची सवय लागली आहे, दुसऱ्यांना पाठिंबा द्यायची लागलेली ही सवय आता बंद करा. तालुक्यातील राष्ट्रवादी पक्षाची संघटना मजबूत करण्यासाठी कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी प्रयत्न केला पाहिजे असे पाटील यांनी सांगितले.


तालुक्यातील असणारे प्रश्न प्राधान्याने सोडविले जातील, टेंभू म्हैसाळ योजनेचे प्रलंबित असणारे सर्व प्रश्न मार्गी लावण्यासाठीच निश्चित प्रयत्न होतील शिवाय प्रत्येक गावाला पाणी कसे मिळेल यासाठी नेटाने प्रयत्न करण्यात येतील पण तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस संघटना बळकट करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. इतरांना पाठिंबा देण्याची असलेली सवय आता बंद करायला हवी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मजबूत कसा होईल आणि प्रभाव कसा वाढेल याकडे प्रत्येक कार्यकर्ता आणि पदाधिकारी यांनी लक्ष दिले पाहिजे. डाळींब आणि द्राक्ष उत्पादकांपुढे बरीच आव्हाने असून ही आव्हाने पेलण्यासाठी निश्चित प्रयत्न करण्यात येतील असा विश्वास देखील जयंत पाटील यांनी दिला. 


  


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !