BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

६ मे, २०२४

कुत्रा भुंकला म्हणून खुनाचा प्रयत्न, आरोपीला अटकपूर्व जामीन !



शोध न्यूज : कुत्रा भुंकण्याच्या कारणावरून थेट खुनी हल्ला होण्याच्या एका घटनेप्रकरणी संशयित आरोपी माऊली वाघमारे यांना उच्च न्यायालयात  अटकपूर्व जामीन मंजूर  करण्यात आल्याची माहिती एड. जयदीप माने यांनी दिली आहे. 


भांडण होण्यास अलीकडे किरकोळ कारण देखील पुरेसे ठरते, लहानशा कारणावरून थेट एखाद्याचा खून होण्यापर्यंत प्रकरण जाते, अशा अनेक घटना आपल्या अवतीभवती घडत असताना, पंढरपूर तालुक्यात एक अशीच काहीशी घटना घडल्याचे प्रकरण पोलिसात पोहोचले आहे.  कुत्रा भुंकला आणि केवळ त्या कारणावरून सत्तूरने वार करून खून करण्याचा प्रयत्न झाल्याचे प्रकरण, पंढरपूर तालुका आणि सोलापूर जिल्ह्यात देखील चर्चेचे ठरले होते. कुत्रा भुंकणे हे काही वादाचे कारण ठरू शकत नाही, तरी देखील कासेगाव येथे हे प्रकरण वाढले गेले आणि यातून जीवघेणा हल्ला झाल्याचे सांगण्यात आले.  हे प्रकरण पंढरपूर तालुक्यातून उच्च न्यायालयात पोहोचले आणि तेथे मात्र आरोपीस अटकपूर्व जमीन मंजूर करण्यात आला आहे. 


कासेगाव, ता. पंढरपूर (Pandharpur crime) येथे आरोपी वाघमारे कुटुंबियांचा पाळीव कुत्रा  फिर्यादीवर भुंकलेच्या कारणावरून झालेल्या भांडणात, फिर्यादीवर सत्तुर ने वार करून खुनाचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून आरोपी माऊली उर्फ हरिदास वाघमारे यांच्याविरुद्ध, पंढरपूर तालुका पोलीस स्टेशन येथे भारतीय दंड विधान . कलम ३०७ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला होता.  या प्रकरणी आपल्याला अटक होऊ नये यासाठी, वाघमारे यांनी  पंढरपूर सत्र न्यायालयात अर्ज केला होता, न्यायालयाने मात्र त्याचा हा अर्ज फेटाळून लावला होता.. त्या निकाला विरुद्ध आरोपीने प्रसिद्ध वकील. ॲड. जयदीप माने यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयात (High Court) अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. सदर अटकपूर्व जामीन अर्जाची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयात होऊन उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला. फिर्यादीचा खून करण्याचा कोणताही उद्देश नव्हता असे घटनेवरून दिसून येते, असा युक्तिवाद आरोपीचे वकील ॲड. जयदीप माने यांनी मुंबई उच्च न्यायालयातील अटकपूर्व जामीनाच्या सुनावणी दरम्यान केला. न्यामुर्तींनी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून,  आरोपी  वाघमारे याचा अटकपूर्व जामीन मंजूर केला .याप्रकरणी आरोपीतर्फे ॲड. जयदीप माने यांनी तर सरकारतर्फे ॲड. राजश्री न्यूटन यांनी काम पाहिले.


शरद पवारांची प्रकृती अस्वस्थ !

 राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचे प्रमुख आणि देशातील मोठे नेते शरद पवार यांची प्रकृती बिघडली असुन्म यामुळे त्यांचे आजचे सगळे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. त्यांच्या प्रकृतीविषयी अनेकांना चिंता वाटू लागली आहे.

गेल्या काही दिवसापासून शरद पवार यांच्यावर प्रचंड ताण आहे, या वयात देखील ते निवडणुकीच्या निमित्ताने दिवस रात्र परिश्रम घेत आहेत, सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराची शेवटची सभा त्यांनी काल बारामती येथे घेतली आणि या सभेच्या दरम्यान त्यांना काहीसा त्रास जाणवू लागला होता. त्या आधी त्यांची रोज प्रवास केलेला आहे आणि अनेक प्रचार सभा घेतल्या आहेत, या सगळ्यांचा परिणाम त्यांच्या प्रकृतीवर झाला असल्याचे दिसत आहे. शरद पवार हे गेल्या अनेक दिवसांपासून महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते असल्याने राज्यभरात अनेक ठिकाणी सभा घेत होते. मविआच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी त्यांनी राज्यभरात अनेक ठिकाणी दौरे केले आहेत. सततचे कार्यक्रम आणि दौऱ्यांमुळे झालेल्या धगधगीमुळे त्यांना आता अस्वस्थ वाटतं असावं, असं बोललं जात आहे शरद पवार यांची तब्येत बिघडल्यामुळे त्यांचे आजचे  सर्व नियोजित कार्यक्रम करण्यात आले रद्द आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या अनेक सभा होत्या. तसेच अनेक नियोजित कार्यक्रम होते. मात्र तब्येत अस्वस्थामुळे शरद पवारांचे कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती पक्षाच्या वतीने देण्यात आली आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !