BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

३ नोव्हें, २०२३

ईडी लाच पडल्या बेड्या ! फुकटच्या पैशाचा झाला मोह !

 


शोध न्यूज : देशातील भल्या भल्यांची झोप उडविलेल्या आणि गेल्या काही वर्षात वादग्रस्त ठरलेल्या ईडी च्या अधिकाऱ्यांनाच बेड्या ठोकण्यात आल्या असून, फुकटच्या पैशाचा मोह त्यांना भलताच महागात पडला आहे.


भारतात मोदी सरकार आल्यापासून ईडी अर्थात अंमलबजावणी संचालनालयाचा भलताच बोलबाला झाला आहे. आजवर या इडीचे नावही कुणाला माहित नव्हते पण आज देशातील सामान्य नागरिकांनाही ही ईडी आणि तिचे कारनामे माहित झाले आहेत. देशातील अनेक राजकीय विरोधकांना या ईडी ने तुरुंगात डांबले आहे. महाराष्ट्रात तर धुमाकूळ घातला असून, या संस्थेच्या बळावर भारतीय जनता पक्षाने राज्यात सरकार स्थापन केले आहे, असा आरोप राजकीय विरोधक सतत करीत आहेत. भ्रष्टाचार प्रकरणांची चौकशी करणारी म्हणून ओळख असलेली ही ईडी (ED) प्रत्यक्षात किती 'धुतल्या तांदळाची' आहे हे आता पुन्हा एकदा समोर आले आहे. इडीच्या कार्यपद्धतीवर न्यायायालाने अनेकदा ताशेरे मारलेले असतानाच, आता या विभागाचे दोन अधिकारी लाच प्रकरणी गजाआड गेले आहेत. त्यामुळे या विभागात नक्की काय चालते ? या प्रश्नाचे उत्तर समोर आले आहे.


ईडीकडून होणाऱ्या चौकशीची आणि त्यांच्या अटकेची भल्याभल्यांना मोठी भीती वाटत असते, त्यांनी एकदा अटक केली की, जामीन मिळणेही कठीण होऊन बसते. देशातील भ्रष्ट्राचारावर नियंत्रण ठेवणारी ही संस्थाच कशी भ्रष्ट आहे याचे उदाहरणच आता समोर आले आहे. राजस्थान लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) ईडीच्या अधिकाऱ्यांना पंधरा लाख रुपयांच्या लाच प्रकरणी बेड्या ठोकल्या आहेत. नवकिशोर मीना असे नाव असलेल्या ईडी अधिकाऱ्याने एका प्रकरणात तक्रारदाराकडे १७ लाख रुपयांची लाच (Bribe) मागितली होती.  चिटफंड प्रकरणात अटक न करण्याच्या बदल्यात त्यानं तक्रारदाराकडं ही  लाच मागितली होती. या प्रकरणात अधिकाऱ्यासह त्याच्या साथीदाराला १५ लाखांची लाच घेताना एसीबीनं रंगेहात पकडून त्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत.  त्यामुळे अंमलबजावणी संचालनालयाच्या वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहेच पण त्यांचे बिंग देखील आता या प्रकरणाने फुटले आहे.


चिटफंड घोटाळा प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने दाखल केलेल्या एका खटल्यात, मालमत्ता जप्ती आणि अटक न करण्यासाठी तक्रारदाराकडे अंमलबजावणी संचालनालयाच्या अधिकाऱ्याने लाचेची मागणी केली होती. या प्रकरणी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली आणि त्यानंतर पुढील कारवाई झाली आहे. (Enforcement Directorate officials arrested in bribery case) अधिकारी नवलकिशोर मीना आणि त्याचा साथीदार बाबुलाल मीना उर्फ दिनेश खैरथल तीजारा या दोघांना, लाच प्रकरणी अटक करण्यात आली आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. भल्याभल्यांची झोप उडविणाऱ्या अंमलबजावणी संचालनालयाचीच झोप या घटनेने उडवून दिली असून, या संस्थेच्या विश्वासार्हतेलाही मोठा धक्का लागला आहे.  



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !