एका मतीमंद महिलेच्या असहायतेचा गैरफायदा उठवत अर्जुन सुर्यकांत कदम या नराधमाने गेल्या पाच सहा महिन्यापासून सतत बलात्कार केला आहे. पिडीत महिलेच्या घरात कुणी नसताना आणि तिला गाईच्या गोठ्यात बोलावत गेल्या सहा ते सात महिन्यापासून तिच्यावर बलात्कार करण्यात येत होता. मतीमंद महिला हा सगळा अत्याचार सहन करीत होती. नराधमाने तिच्या मतीमंदतेच गैरफायदा उठवत तिच्यावर सतत बलात्कार केला. सदर पिडीत महिला गाईच्या गोठ्यात जाण्यास नकार देत होती परंतु अशावेळी नराधमाने तिला दमदाटी केली. ती गोठ्यात येत नसल्याचे पाहून तो तिला शिवीगाळ करायचा तसेच मारहाण देखील करीत होता. विरोध केला तर तिला ठार मारण्याचीही धमकी देत असायचा. त्याच्या या मारहाणीला घाबरून पिडीत नाईलाज म्हणून गोठ्यात जात राहिली आणि तो तिच्यावर बलात्कार करीत राहिला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
पिडीत महिलेच्या बहिणीने अर्जुन कदम याच्याविरोधात पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात दिली असून पोलिसांनी याप्रकरणी कदम याच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. गेली काही महिने हा प्रकार सुरु होता पण याची कुणालाच माहिती मिळालेली नव्हती. पिडीत महिलेच्या पोटात दुखू लागल्याने हा प्रकार उघडकीस आला. या महिलेच्या पोटात दुखत असल्यामुळे पिडीत महिलेच्या पत्नीला शंका आली. तिच्यासोबत काही वेगळे घडले असावे अशी शंका आल्याने बहिणीने अधिक चौकशी केली. पिडीत महिलेला विश्वासात घेवून विचारपूस केली असता हा धक्कादायक प्रकार समोर आला. (Mentally retarded woman repeatedly raped in Pandharpur) संशयित आरोपी अर्जुन कदम याला पोलिसांनी अटक केली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक प्रशांत भागवत हे करीत आहेत. या घटनेने पंढरपूर शहरात खळबळ उडवून दिली आहेच पण मतीमंद महिलेचा गैरफायदा उठविल्याचा संताप देखील व्यक्त होऊ लागला आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !