BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१५ डिसें, २०२१

सोलापूर प्रशासनाने दणका देताच पळू लागले रांगा लावायला !

 



सोलापूर : सोलापूर प्रशासन आणि जिल्हाधिकारी यांनी दणका देताच लसीकरण केंद्रावर रांगा लागू लागल्या असून अवघ्या २३ दिवसात ३ लाखाहून अधिक नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतली आहे. 


शासनाने लसीकरण मोहीम हाती घेऊन जवळपास एक वर्ष पूर्ण होत आले पण अद्याप पाहिलाही डोस न घातलेले लाखो लोक सोलापूर जिल्ह्यात आहेत. कोरोनाच्या धास्तीने सुरुवातीच्या काळात लसीकरण केंद्रावर रांगा लागल्या होत्या पण नंतर हा उत्साह कमी होत गेला. कोरोना परतीच्या प्रवासाला लागला की लोकांनी लसीकरणाकडे पाठ फिरवली. कोरोनाच निघून चालला आहे मग लसीची गरज काय ? असे अनेकांना वाटू लागले पण पुन्हा ओमीक्रोन व्हेरीएंट हा नवा अवतार आला आणि पुन्हा लसीकरणास रांगा लागू लागल्या. नव्या विषाणूमुळे शासन आणि प्रशासन अधिक सतर्क झाले असून प्रशासनाने लसीकारण मोहीम गतिमान करण्यासाठी आवश्यक ते सर्व उपाय योजण्यास सुरुवात केली आहे. त्यातच काही निबंध घालण्यात आले आहेत आणि कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. 


लस हा विषय ऐच्छिक असल्याने प्रशासन सक्ती करू शकत नाही आणि त्यासाठी कारवाई करू शकत नाही असा मुद्दा काहींनी पुढे आणला आहे. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दोनही डोस घेतले नसलेल्यांना पेट्रोल, डीझेल, किरणा, दारू मिळणे कठीण झाले असून त्यांना हॉटेलमध्येही प्रवेश दिला जाणार नसल्याचा आदेश दिला आहे. निर्बंध कायदेशीर नसले तरी लोकहितासाठी ते घेतलेले असून जिल्हाधिकारी आपल्या आदेशावर ठाम आहेत. लसीकरण कमी असलेल्या गावात शंभर टक्के लसीकरण ५ ते १० जानेवारीपर्यंत पूर्ण करण्यासाठी वेगाने प्रयत्न सुरु केले आहेत. 

अद्याप पहिलाही डोस न घेतलेले ७ लाख ३३ हजार ००६ नागरिक सोलापूर जिल्ह्यात आहेत. ३ लाख ०३ हजार ७६१ व्यक्तींनी लसीचा पहिला डोस घेतला आहे तर ५ लाख ०२ हजार ३३२ नागरिकांनी दुसराही डोस घेतला आहे. शंभर टक्के लसीकरण करणे हे प्रशानासामोरील उद्दिष्ट आहे


जिल्ह्यातील ३४ लाख १४ हजार ४०० नागरिकांचे लसीकरण होण्याची गरज असून यात ग्रामीण भागातील २६ लाख ८० हजार १७ नागरिक आहेत तर शहरी भागातील  ७ लाख ३४ हजार ३८३ नागरिकांचा समावेश आहे. सात लाखाहून अधिक लोकांनी अद्याप लस न घेतल्याने प्रशासन अधिक दक्ष झाले आहे. जिल्हाधिकारी यांनी आक्रमक निर्णय घेताच नागरिक लसीकरण केंद्रावर पुन्हा गर्दी करू लागले असून नाक दाबले की तोंड उगडते याचा प्रत्यय येताना दिसत आहे. २२ नोव्हेंबर ते १४ डिसेंबर या २३ दिवसात ३ लाख ३ हजार ७६१ नागरिकांनी कोरोना प्रतिबंधाची लस घेतली आहे. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी घेतलेल्या कडक भूमिकेमुळे हे आकडे वाढताना दिसत आहेत.  


जिल्हाधिकारी यांनी आक्रमक पवित्र घेताच लसीकरणाचा वेग वाढला असून २३ दिवसात झालेल्या लसीकरणात ३ लाखाहून अधिक व्यक्तींनी पहिला डोस घेतला आहे तर पाच लाखाहून अधिक व्यक्तींनी दुसरा डोस घेतला आहे. लसीकरण हा केवळ लोकहिताचा विषय आहे त्यामुळे या मोहिमेत व्यत्यय आणण्याचा कोणी प्रयत्न करीत असेल तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याच्या सूचना जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.  कोरोना प्रतिबंधासाठी लस नाही घेतली तर अनेक अडचणींचा सामना करण्याची वेळ येते याची जाणीव झाल्याने नागरिक लस घेण्यासाठी आता गर्दी करू लागले आहेत. काहींनी याबाबत न्यायालयात जाण्याचा दबाव आणला असला तरी लसीकरण मोहिमेवर अथवा निर्बंधावर कोणताच फरक पडलेला दिसत नाही. अशाच प्रकारे लसीकरण झाल्यास शंभर टक्के लसीकरणाचे उद्दिष्ट लवकरच गाठले जाईल असे चित्र आजतरी दिसते आहे.       

  • लसीचे डोस शिल्लक : 2.49 ल

वाचा >>>  : 'पहिल्यांदाच ! चार सख्खे भाऊ आणि चारही आमदार' !


तुंगत अपघातात जखमींच्या किंकाळ्या, रस्त्यावर रक्ताचा सडा !



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !