BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२२ ऑग, २०२२

मजुरांचे हात बांधून अमानुष मारहाण !



शोध न्यूज : मजुरांचे हात बांधून अमानुष मारहाण केल्याच्या माढा तालुक्यातील घटनेप्रकरणी चार जणांच्या विरोधात मारहाणीसह ऍट्रॉसिटी आणि अपहरणाचा देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील भुताष्टे येथे अत्यंत थरारक आणि अमानुष घटना घडल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. विशेष म्हणजे हात बांधून मारहाण केली जात असल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून मोठ्या प्रमाणात तो पहिला जात आहे. दोघांना एका पत्र्याच्या खोलीत जमिनीवर बसविले असून त्यांचे हात मागे घेऊन एका दोरीने बांधले गेले आहेत आणि त्यांना हाताने, दोरीने मारहाण केली जात आहे. दोघेजण गयावया करत आहेत परंतु त्यांची कुणालाही दया येत नाही उलट अत्यंत घाणेरड्या शिव्या देत सदर दोन तरुणांना मारहाण केली जात असल्याचे या व्हिडीओत दिसत आहे. सदर घटनेबाबत माढा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


सदर मारहाणीत जखमी झालेला मजुराची पत्नी सोनाली विकास नाईकवाडे यांनी माढा पोलिसात फिर्याद दिली आहे. माढा तालुक्यातील भुताष्टे गावातील विजेच्या पोलचे मुकादम बालाजी मोरे यांच्याकडे विकास नाईकवाडे आणि सेविकदास कसबे हे दोन मजूर काम करीत होते. गेल्या दोन महिन्यापासून हे दोघेही मजूर मोरे यांच्याकडे कामासाठी होते. केलेल्या या कामाचे पैसे घेऊन जा म्हणून त्यांना बोलावून घेण्यात आले आणि त्यांना एका पत्र्याच्या खोलीत नेवून बेदम मारहाण करण्यात आली. शिवीगाळ, दमदाटी करीत पांढऱ्या दोरीने आणि हातानी या दोघांना मारहाण करण्यात आली. मारहाण करताना अत्यंत घाणेरड्या शिव्या देण्यात येत होत्या. दोघांचे हात मागच्या बाजूला घेऊन एका दोरीने बांधण्यात आलेले होते. स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी देश स्वातंत्र्यदिन साजरा करीत होता आणि इकडे दोघांना बंदी बनवून अमानुष मारहाण होत होती. 


माढा पोलिसात फिर्याद दाखल झाल्यावर विजेच्या पोलचे मुकादम बालाजी मोरे, भालचंद्र आनंद यादव, मधुकर हाके आणि गुरुशरणकुमार मंडल या चौघांच्या विरोधात मारहाण, अपहरण आणि ऍट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला गेला आहे. माढा तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात या घटनेने मोठी खळबळ उडवून दिली आहे. हा सर्व अमानुष प्रकार सुरु असताना या घटनेचा व्हिडीओ बनविण्यात आला आहे. (Inhumane beating of laborers by tying their hands) हाच व्हिडीओ वेगाने व्हायरल होत असून कशा प्रकारे बांधण्यात आले आणि शिवीगाळ करीत मारहाण करण्यात आली हे पाहायला मिळत आहे. 




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !